टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 08:31 IST2026-05-10T08:26:50+5:302026-05-10T08:31:13+5:30

Nida Khan Nashik case: निदा खान हिच्याविरुद्ध देवळाली कॅम्प व मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ती सध्या पोलिस कोठडीत आहे.

TCS case: 'Spot Panchnama' with Nida Khan, family members also questioned at Nashik Police Commissionerate | टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी

टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी

नाशिक : 'टीसीएस' प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.११) पोलिस कोठडी सुनावल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या एसआयटी पथकाने शनिवारी (दि.९) टीसीएसच्या तत्कालीन कार्यालयात तिला नेऊन 'स्पॉट पंचनामा' पूर्ण केला. तसेच निदा व तिच्या पालकांकडे पोलिसांनी शनिवारी आयुक्तालयात चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

निदा खान हिच्याविरुद्ध देवळाली कॅम्प व मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. देवळाली कॅम्पच्या गुन्ह्यात पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगरामधून अटक करून न्यायालयात हजर केले होते. 

घटनास्थळी जाऊन पंचनामा

ती सध्या पोलिस कोठडीत आहे. शनिवारी (दि.९) निदाला घेऊन पोलिसांनी पुन्हा वडाळा शिवारातील तत्कालीन टीसीएसच्या कार्यालय जे गुन्ह्याचे घटनास्थळ आहे, ते गाठले. तेथे पोलिसांनी पंचनामा पूर्ण केला.

यानंतर दुपारी तिला पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. यावेळी तिच्याकडे व तिचे आई, वडील, भावाकडेसुद्धा पोलिसांनी चौकशी केली. 

अडीच वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे चौकशीसत्र सुरू होते. दरम्यान, निदा खानसह तिचे आई, वडील, भाऊ, मावशी यांचेही मोबाइल चौकशीदरम्यान पोलिसांनी तपासले. त्यांना समोरासमोर बसवूनसुद्धा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी काही प्रश्न विचारल्याचे समजते.

नगरसेवकाचीही चौकशी

छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचे नगरसेवक संशयित माजिद पटेल यांनी निदा खान हिला आश्रय दिल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे पटेल यांनाही या गुन्ह्यात शहर पोलिसांनी सहआरोपी केले आहे. त्यांचीही पोलिसांनी चौकशी करत नोटीस दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title : टीसीएस मामला: निदा खान का स्पॉट पंचनामा, नासिक पुलिस द्वारा परिवार से पूछताछ

Web Summary : नासिक पुलिस ने टीसीएस मामले में मुख्य संदिग्ध निदा खान के साथ स्पॉट पंचनामा किया और उसके परिवार से पूछताछ की। जांच में मोबाइल फोन की जांच और खान को शरण देने के संदेह में एक पार्षद से पूछताछ शामिल थी।

Web Title : TCS Case: Nida Khan's Spot Panchnama, Family Questioned by Nashik Police

Web Summary : Nashik police conducted a spot panchnama with Nida Khan, the main suspect in the TCS case, and questioned her family. The investigation included examining mobile phones and questioning a corporator suspected of harboring Khan.