कणकवलीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष ! फटाक्यांची आतषबाजी : रॅली काढून आनंद केला व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 05:17 PM2019-11-23T17:17:31+5:302019-11-23T17:19:03+5:30

कणकवली शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली . तसेच कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालय ते एस टी स्टँड समोरून , पटवर्धन चौक ते बाजारपेठ मार्ग फटाक्यांची आतषबाजीत मिरवणूक काढली .

BJP activists cheering in Karnavali! Fireworks of fireworks: expressed joy over taking rally | कणकवलीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष ! फटाक्यांची आतषबाजी : रॅली काढून आनंद केला व्यक्त

कणकवली भाजप कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला.

googlenewsNext
ठळक मुद्दे कणकवली शहरातून शनिवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढली.

कणकवली : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवार यांनी शपथ घेतल्याचे वृत्त समजताच शनिवारी कणकवली शहरात भारतीय जनता पार्टी मार्फत एकच जल्लोष करण्यात आला. तसेच विविध घोषणाही यावेळी देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी शहरातून रॅलीही काढली .

कणकवली शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली . तसेच कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालय ते एस टी स्टँड समोरून , पटवर्धन चौक ते बाजारपेठ मार्ग फटाक्यांची आतषबाजीत मिरवणूक काढली . यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे , भाजप जिल्हा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे , माजी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर , संदीप मेस्त्री, सोनू सावंत , नगरसेवक संजय कामतेकर , अभिजीत मुसळे , राकेश परब , सदा चव्हाण, समर्थ राणे
किशोर राणे, चारुदत्त साटम, नितीन नलावडे, रमेश पावसकर, संतोष राणे, सचिन पारधिये, समीर सावंत आदींसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: BJP activists cheering in Karnavali! Fireworks of fireworks: expressed joy over taking rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.