फिल्मी: "उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
'बिग बॉस मराठी'चं सहावं पर्व सुरू झालं होतं, तेव्हा घरात तब्बल १७ सदस्यांनी एन्ट्री घेतलेली. आता घरात फक्त ५ सदस्य उरलेत. घरात आलेल्या सदस्यांमध्ये 'बिग बॉस हिंदी'करुन आलेल्या मराठमोळ्या मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या सोनाली राऊत हिचाही समावेश होता. पण, सोनाली सुरुवातीलाच घराबाहेर पडली. आता याच सोनाली राऊतनं सीझन अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाच 'बिग बॉस मराठी'वर गंभीर आरोप केले आहेत. सोनालीनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
व्यापार: नोकरी गेल्यावर PF खात्यातील रकमेवर व्याज मिळते का? जाणून घ्या EPFO चा 'हा' नियम
EPFO: करिअरमध्ये चढ-उतार येणे सामान्य आहे. नोकरी जाणे, कंपनी बंद होणे किंवा ब्रेक घेणे...यामुळे नियमित पगार थांबतो आणि आर्थिक सुरक्षिततेची चिंताही वाढते. अशा वेळी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, प्रॉविडंट फंड (PF) मध्ये जमा झालेल्या रकमेचे काय होईल? नोकरी गेल्यानंतर त्यावर व्याज मिळणे थांबेल का? या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
राष्ट्रीय: सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
महाकुंभ मेळ्यात सौंदर्यामुळे प्रसिद्धी मिळालेली हर्षा रिछारिया हिने संन्यास घेतला. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये रविवारी तिने स्वतःचे पिंडदान केले. मंगलनाथ येथील गंगाघाटावर मोनी तीर्थ पीठाधीश्वर सुमनाजी महाराज यांच्याकडून हर्षाने दीक्षा घेतली. संसार सुखाचा त्याग करत हर्षाने संन्यासी जीवनात प्रवेश केला.
व्यापार: नाशिकमध्ये तयार होणार १०० Su-57 फायटर जेट्स; रशियाची भारताला मोठी ऑफर...
भारत आणि रशियाचे संबंध सर्वश्रृत आहेत. रशियाने वेळोवेळी भारताला लष्करी साहित्य पुरवले आहे. आता पुतिन सरकारने भारताला गेल्या दशकातील सर्वात मोठा लष्करी विमान प्रस्ताव दिला आहे. त्याअंतर्गत भारतात किमान १०० Su-57 स्टेल्थ फायटर जेट्सचे उत्पादन केले जाणार आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान हस्तांतरणचीदेखील ऑफर दिली आहे. हा प्रस्ताव अशा वेळी आला आहे, जेव्हा भारतीय वायुसेनेला (IAF) लढाऊ विमानांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे.
पुणे: Pune Crime : पुण्यात मृत व्यक्तीच्या नावे मालमत्ता हडपणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
लोहगाव : पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे जी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभेल अशी आहे. मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यवधींची मालमत्ता हडपणाऱ्या एका सराईत टोळीचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे
व्यापार: मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाचा परिणाम थेट भारताच्या ऊर्जा क्षेत्रावर पडल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मार्च महिन्यात देशातील एलपीजी (LPG) वापरात सुमारे १३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ऊर्जा दरांमध्ये अस्थिरता वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुणे: Pune Crime : बारामतीत कोयत्याचा वार करत प्रेमी युगुलाला लुटणारा आरोपी अखेर 'जेरबंद'
बारामती : तांदुळवाडी येथील एलसी कंपनी लेक परिसरात तरुणावर कोयत्याने हल्ला करून लूट करणाऱ्या आरोपीला अखेर बारामती तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सोन्याची साखळी जप्त करण्यात आली आहे.
व्यापार: अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
अक्षय तृतीया हा सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जाणारा सण आहे. आजच्या दिवशी सराफा बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र, सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करताना ग्राहकांनी विशेष काळजी घेणंही आवश्यक आहे. खरेदीपूर्वी सोन्याचे दर, त्याची शुद्धता आणि योग्य पडताळणी याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.
पुणे: Pune Crime : अपघात की घातपात ? आळंदीत मॉर्निंग वॉकदरम्यान महिलेला टाकीत मृतदेह दिसला
आळंदी : येथील नगर परिषदेच्या मालकीच्या जुन्या व सध्या बंद अवस्थेत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाकीत गुरुवारी (दि. १६) सकाळी एका ३६ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सिद्धबेट परिसरात घडली.
पुणे: Pune crime : प्रेमासाठी मुलाचाच ‘काटा काढला’; आई-प्रियकराचा थरकाप उडवणारा कट उघड
चाकण : प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या आपल्या सहा वर्षांच्या मुलाचा आईने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची धक्कादायक घटना कुरुळी (ता. खेड) येथे घडली होती. या गुन्ह्यातील फरारी मुख्य आरोपी राम विनायक कजेवाड याला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथून सिनेमॅटिक स्टाईलने शनिवारी (दि. १७) बेड्या ठोकल्या.
आंतरराष्ट्रीय: होर्मुझमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार: इराणची प्रतिक्रिया
होर्मुझ सामुद्रधुनीत इराणच्या नौदलाने भारतीय जहाजांवर गोळीबार केल्याच्या वृत्तावर इराणने प्रतिक्रिया दिली आहे. शांततापूर्ण तोडग्याची आशा व्यक्त करत, अधिकाऱ्यांनी घटनेबद्दल अनभिज्ञता दर्शवली आणि भारत-इराण संबंध दृढ असल्याचे सांगितले.
फिल्मी: तब्बूने मुंबईत वर्सोवा येथे घेतला आलिशान फ्लॅट, किंमत किती?
बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट देणारी तब्बू गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. तब्बूने वर्सोवा येथील 'गोदरेज स्कायशोर' मध्ये 10 कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला, जो 2,153 चौरस फुटांचा आहे. तिने 5.24 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आणि तिला दोन पार्किंग स्लॉट मिळाले. या प्रकल्पात 24 मजले आणि 126 निवास आहेत. वर्सोवामध्ये याआधीही अनेक सेलिब्रिटींनी गुंतवणूक केली आहे.
क्रिकेट: IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत घरच्या मैदानात SRH ची हवा
अभिषेक शर्मा आणि हेन्री क्लासेन यांच्या दमदार अर्धशतकी खेळीनंतर एशान मलिंगाचा भेदक मारा आणि अखेरच्या षटकात प्रफुल हिंगेनं अचूक टप्प्यावर केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने घरच्या मैदानात १० धावांनी विजय नोंदवला. दुसरीकडे धावांचा पाठलाग करताना ठराविक अंतराने विकेट गमावल्यावरही चेन्नई सुपर किंग्सचा संघ सामन्यात होता. पण एकाही बॅटरला जबाबदारी घेऊन मोठी खेळी करण्याची हिंमत दाखवता आली नाही. त्याची किंमत चेन्नई सुपर किंग्सला पराभवाने चुकवावी लागली.
छत्रपती संभाजीनगर: गेल इंडियाची छत्रपती संभाजीनगरमध्ये ३,८०० कोटींची सौर ऊर्जा गुंतवणूक.
गेल इंडियाने छत्रपती संभाजीनगरमध्ये 3,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करत 100 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. 22 एमडब्ल्यूएच क्षमतेच्या बीईएसएस प्रणालीमुळे 24 तास हरित ऊर्जा मिळेल, ज्यामुळे डीएमआयसी क्षेत्रातील वाढत्या मागणी पूर्ण होईल.
क्रिकेट: IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
लोकेश राहुल आणि ट्रिस्टन स्टब्सच्या दमदार अर्धशतकानंतर डेविड मिलरच्या किलर फिनिशिंग टचच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने रोमहर्षक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला ६ विकेट्स राखून पराभूत केले. बंगळुरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना फिल सॉल्टच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पाहुण्या दिल्ली कॅपिटल्ससमोर १७६ धावांचे टार्गेट सेट केले होते. अखेरच्या षटकात १५ धावांची गरज असताना डेविड मिलरनं दोन षटकार मारत संघाचा विजय निश्चित केला.
बीड: वाल्मीक कराडला पोटदुखी: सिस्टायटिस निदान; आजार काय आहे?
आरोपी वाल्मीक कराड, पोटदुखीमुळे त्रस्त, तपासणीत सिस्टायटिसचे निदान. डॉक्टरांनी औषधोपचार केले, रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. त्याचे बदललेले रूप आणि कडक सुरक्षा दिसून आली.
बीड: तहसीलदारांच्या मृत्यूचे गूढ वाढले: मोबाईल गायब, कारची अदलाबदल, गुन्हे शाखेकडे तपास.
तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी गुन्हे शाखेकडे. मोबाईल, लॅपटॉप गायब, गाडी बदलली. सोबत असलेली व्यक्ती बेपत्ता. घातपाताच्या शक्यतेने तपास सुरू.
व्यापार: छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल
छत्तीसगडमधील वेदांता प्लांटमध्ये झालेल्या अपघाताप्रकरणी कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांच्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर जिंदाल स्टीलचे चेअरमन नवीन जिंदाल अनिल अग्रवाल यांच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर अनिल अग्रवाल यांच्या विरोधात नोंदवलेल्या एफआयआरचा स्क्रीनशॉट शेअर करत आपली भूमिका मांडली आहे.
व्यापार: UPI चा सतत वापर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करतो का?
आजच्या काळात चहाच्या टपरीपासून ते मोठ्या शॉपिंग मॉलपर्यंत प्रत्येक ठिकाणी UPI चा दबदबा आहे. रोख रक्कम सोबत ठेवण्याची कटकट संपली असून, फक्त मोबाईल काढून स्कॅन केलं की पेमेंट पूर्ण होतं. मात्र, या वाढत्या डिजिटल व्यवहारामुळे अनेकदा लोकांच्या मनात भीती असते की, जास्त ट्रान्झॅक्शन केल्यामुळे आपला सिबिल स्कोर (CIBIL Score) कमी तर होणार नाही ना?
छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा विकास: 'व्हिजन २०२९' लाँच; नवे विभागीय आयुक्त रुजू.
जी. श्रीकांत यांनी विभागीय आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली, मराठवाड्याच्या विकासाला प्राधान्य. नियोजित विकास, जिल्हा समस्यांचे निराकरण, पर्यटन, शिक्षण आणि रोजगाराला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. १००% ई-ऑफिस अंमलबजावणी आणि प्रशासकीय समन्वयावर भर दिला जाईल.
व्यापार: अक्षय्य तृतीयेआधी सोने स्वस्त; खरेदीदारांना मोठा दिलासा
अक्षय्य तृतीयेच्या ठीक एक दिवस आधी सोन्याच्या किमतीत घट झाली असून, सणानिमित्त खरेदीची तयारी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. सामान्यतः या सणापूर्वी सोन्याच्या दरात वाढ होताना दिसते, परंतु यंदा बाजारपेठेत उलट चित्र पाहायला मिळत आहे. देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये सोन्याच्या दरात घसरण झाली असून चांदीही स्वस्त झाली आहे.
राष्ट्रीय: PM मोदी देशाला संबोधित करणार, महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत पारित न झाल्याने केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. मोदी यांनी विरोधकांच्या भूमिकेला चूक असल्याचं म्हटलं आहे. भविष्यात त्यांना मोठी राजकीय किंमत चुकवावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. तर संविधान दुरुस्ती विधेयकाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही असं राहुल गांधींनी म्हटलं.
छत्रपती संभाजीनगर: निवृत्तीवेतन घोटाळा: लिपिकास जन्मठेप, बसचालकाची क्रूर हत्या
निवृत्तीवेतन निधी हडपल्याने बसचालकाचा खून; लिपिकास जन्मठेप. आरोपीने पैशांसाठी चालकास बोलावून निर्घृणपणे हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
व्यापार: डीए वाढ मंजूर; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ!
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) २ टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात आला होता.
छत्रपती संभाजीनगर: साडीतील टोळीने वकिलाचा जीव घेतला; मुख्य आरोपी ताब्यात, टोळी फरार.
ॲड. मिथुन भास्कर यांची छत्रपती संभाजीनगरजवळ लूटमारीतून हत्या. साडी नेसलेल्या टोळीने पैशांसाठी हल्ला केला. दोन आरोपींना अटक, पोलिस कोठडी. टोळीने वकीलला मारहाण करून पाकीट, मोबाईल हिसकावला. पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
व्यापार: इराण-इस्रायल युद्धाचा जगाला धक्का; ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट
इराण आणि इस्रायलमधील ५० दिवसांच्या तणावाचा परिणाम जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यावर झाला आहे. उत्पादनात अडथळे आल्यामुळे सुमारे ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल बाजारापर्यंत पोहोचू शकलं नाही. 'इकॉनॉमिक टाइम्स'च्या अहवालानुसार, तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की या संकटाचे परिणाम आगामी अनेक महिने आणि वर्षे जाणवतील, कारण पुरवठ्यातील ही तूट भरून काढणं कठीण आहे.
छत्रपती संभाजीनगर: गोळीबारानंतर छ. संभाजीनगर पोलिसांची कारवाई: मुख्य आरोपीसह आठ जण अटकेत
हनुमानगरमधील गोळीबारानंतर पोलिसांनी पवन दिवेकरसह आठ जणांना अटक केली. मिरवणुकीतील फोटोवरून झालेल्या वादानंतर हिंसा भडकली. शहरात लूटमार आणि हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. पाठलाग करून पोलिसांनी पैठण गेटजवळ दिवेकरला पकडले.
पुणे: Pune Crime: प्रेम संबंध, फसवणूक, बॅटने मारहाण ..; सेक्रेटरीचा भाजप पदाधिकाऱ्यासह पत्नी अन् लेकीने असा काढला काटा
पुणे : अनैतिक संबंधातून महिलेला बॅटने मारहाण करुन तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना चंदननगर भागात घडली. या प्रकरणी एका वकिलासह, त्याची पत्नी आणि मुलीला अटक करण्यात आली आहे. पूनम दिनेश मुन (वय ३२, रा. गणेशनगर, येरवडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी वकील ॲड. संजय सावंत, त्यांची पत्नी स्वाती आणि मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पूनमचे पती दिनेश यांनी फिर्याद दिली आहे, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी दिली.
बीड: दु:खद: पावसामुळे नुकसान टाळण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू
कडा येथे पावसापासून शेतीमाल वाचवण्यासाठी ताडपत्री घेऊन परतणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. बाबासाहेब शिंदे (50) यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. दादेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
व्यापार: होर्मुझ सामुद्रधुनी खुली; तेल, एलपीजी, खतांची जहाजं भारताकडे रवाना
होर्मुजची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली झाल्यामुळे भारतीय तेल कंपन्यांसह आयातदार आणि निर्यातदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केल्यानंतर इराणनं हा मार्ग बंद केला होता. जगातील २० टक्के तेल आणि सुमारे एक तृतीयांश गॅस याच मार्गावरून जात असल्यानं जगभरात खळबळ उडाली होती. मात्र, आता हा मार्ग खुला झाल्यानं जगानं सुटकेचा निश्वास सोडला.
फिल्मी: प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या ४० व्या वर्षी निधन, कलाविश्वावर शोककळा
मल्याळम अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे कर्करोगाने वयाच्या ४० व्या वर्षी निधन झाले. 'कस्तुरीमन' आणि 'भाग्यजाटकम' मधील भूमिकांसाठी ते ओळखले जातात. अभिनेत्री सीमा जी. नायर यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात आई आणि भाऊ आहेत.