Pune Crime : बारामतीत कोयत्याचा वार करत प्रेमी युगुलाला लुटणारा आरोपी अखेर 'जेरबंद'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 14:07 IST2026-04-19T14:06:38+5:302026-04-19T14:07:20+5:30

Pune Crime- मैत्रिणीच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेनही काढून घेतली.

Pune Crime The accused who robbed a couple by stabbing them in Baramati Koyata is finally 'arrested' | Pune Crime : बारामतीत कोयत्याचा वार करत प्रेमी युगुलाला लुटणारा आरोपी अखेर 'जेरबंद'

Pune Crime : बारामतीत कोयत्याचा वार करत प्रेमी युगुलाला लुटणारा आरोपी अखेर 'जेरबंद'

बारामती : तांदुळवाडी येथील एलसी कंपनी लेक परिसरात तरुणावर कोयत्याने हल्ला करून लूट करणाऱ्या आरोपीला अखेर बारामती तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सोन्याची साखळी जप्त करण्यात आली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ जून २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६:४५ वाजण्याच्या सुमारास पुलकुंडवार (बदललेले नाव) (वय २२, रा. मार्केटयार्ड, बारामती) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत तांदुळवाडी विमानतळ रोडलगत असलेल्या एलसी कंपनी लेक परिसरातील मोकळ्या जागेत बसले होते. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी तोंडाला रूमाल बांधून त्यांच्यावर हल्ला चढवला. यातील एका आरोपीने देवराज यांना मोबाइल व पैसे देण्याची मागणी केली.

त्यांनी विरोध केल्याने आरोपीने लोखंडी कोयत्याने त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर व मांडीवर वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर आरोपींनी जबरदस्तीने देवराज यांच्याकडील २,५०० रुपये रोख रक्कम व पोको कंपनीचा मोबाइल हिसकावून घेतला. तसेच त्यांच्या मैत्रिणीच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेनही काढून घेतली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्यांच्या मोटारसायकलची चावी घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

या प्रकरणी बारामती तालुका पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर आरोपी फरार होते. मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत आरोपी अजय नंदकुमार सकट (रा.तांदुळवाडी, ता. बारामती) याला दि. १५ एप्रिल २०२६ रोजी अटक केली. अटक केलेल्या आरोपीकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीची ४.९०० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज पाटील, तसेच पोलिस अंमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार, नितीन ढवाण, नीलेश वाकळे आणि राजू बन्ने, शाहरुख शेख यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज पाटील व पोलिस अंमलदार राजू बन्ने करीत आहेत.

Web Title : बारामती: प्रेमी युगल पर हमला करने वाला आरोपी एक साल बाद गिरफ्तार।

Web Summary : बारामती में एक जोड़े पर लूट और हमला करने के एक साल बाद, पुलिस ने अजय सकट को गिरफ्तार किया। आरोपी ने दरांती से हमला किया और नकदी, फोन और सोने की चेन चुराई। पुलिस ने सोने की चेन बरामद की।

Web Title : Baramati: Robbery accused, who attacked couple, arrested after a year.

Web Summary : A year after the robbery and assault of a couple in Baramati, police arrested Ajay Sakat. The accused attacked the couple with a sickle and stole cash, a phone, and a gold chain. Police recovered the gold chain.