Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > नाशिकमध्ये तयार होणार १०० Su-57 फायटर जेट्स; रशियाची भारताला मोठी ऑफर...

नाशिकमध्ये तयार होणार १०० Su-57 फायटर जेट्स; रशियाची भारताला मोठी ऑफर...

सध्या भारतीय वायुसेनेकडे सुमारे ३० फाइटर स्क्वाड्रन आहेत, तर ४२ स्क्वाड्रनची गरज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 15:57 IST2026-04-19T15:56:40+5:302026-04-19T15:57:14+5:30

सध्या भारतीय वायुसेनेकडे सुमारे ३० फाइटर स्क्वाड्रन आहेत, तर ४२ स्क्वाड्रनची गरज आहे.

Russia India Fighter Jet Deal: 100 Su-57 fighter jets to be manufactured in Nashik; Russia's big offer to India | नाशिकमध्ये तयार होणार १०० Su-57 फायटर जेट्स; रशियाची भारताला मोठी ऑफर...

नाशिकमध्ये तयार होणार १०० Su-57 फायटर जेट्स; रशियाची भारताला मोठी ऑफर...

Russia India Fighter Jet Deal: भारत आणि रशियाचे संबंध सर्वश्रृत आहेत. रशियाने वेळोवेळी भारताला लष्करी साहित्य पुरवले आहे. आता पुतिन सरकारने भारताला गेल्या दशकातील सर्वात मोठा लष्करी विमान प्रस्ताव दिला आहे. त्याअंतर्गत भारतात किमान १०० Su-57 स्टेल्थ फायटर जेट्सचे उत्पादन केले जाणार आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान हस्तांतरणचीदेखील ऑफर दिली आहे. हा प्रस्ताव अशा वेळी आला आहे, जेव्हा भारतीय वायुसेनेला (IAF) लढाऊ विमानांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे.

IAF ची गरज अन् रशियाची रणनीती

सध्या भारतीय वायुसेनेकडे सुमारे ३० फाइटर स्क्वाड्रन आहेत, तर अधिकृत गरज ४२ स्क्वाड्रन इतकी आहे. या पार्श्वभूमीवर रशिया हा प्रस्ताव केवळ विमान खरेदीपुरता मर्यादित न ठेवता, एक संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम उभारण्याच्या दृष्टीने पुढे आणत आहे.

नाशिकमध्ये उत्पादनाचा प्रस्ताव

रशियाने हे विमान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या नाशिक प्रकल्पात तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. येथे यापूर्वी Su-30MKI चे उत्पादन झाले आहे. HAL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी. के. सुनील यांच्या माहितीनुसार, रशियन तांत्रिक पथकाने नाशिकमधील सुविधांचा आढावा घेतला असून, सुमारे ५० टक्के विद्यमान पायाभूत सुविधा Su-57 साठी वापरता येऊ शकतात. उर्वरित सुविधांसाठी नव्याने गुंतवणूक आवश्यक असेल.

IAF ची वेगळी प्राधान्ये

रशियाचा प्रस्ताव मोठा असला तरी, भारतीय वायुसेनेची सध्याची भूमिका वेगळी आहे. IAF ला तातडीने ४० ते ६० स्टेल्थ विमानांची थेट सरकारी खरेदी (G2G) हवी आहे, यामुळे कमी वेळेत ऑपरेशनल क्षमता वाढवता येईल. दरम्यान, सरकार तेजस, MRFA आणि AMCA सारख्या स्वदेशी प्रकल्पांवर मोठी गुंतवणूक करत असल्याने, इतक्या मोठ्या उत्पादन कार्यक्रमात तातडीने सहभागी होणे आव्हानात्मक मानले जात आहे.

द्विधा स्थिती

भारतासमोर सध्या मोठा प्रश्न उभा आहे. रशियाचा तंत्रज्ञान हस्तांतरणासह प्रस्ताव स्वीकारायचा, की स्वदेशी प्रकल्पांना प्राधान्य द्यायचे? हा निर्णय भारताच्या भविष्यातील लढाऊ विमान कार्यक्रमाची दिशा ठरवणार आहे. डिफेन्स सिक्युरिटी एशियाच्या माहितीनुसार, रशिया किमान १०० विमानांच्या ऑर्डरवर ठाम आहे. कमी संख्येत उत्पादन केल्यास स्टेल्थ उत्पादन सुविधा उभारणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार नाही. रडार-शोषक कोटिंग, प्रगत एव्हियोनिक्स आणि इंजिन सपोर्ट यासाठीदेखील मोठा खर्च अपेक्षित आहे.

नाशिक ‘स्टेल्थ हब’ बनण्याची शक्यता

रशिया नाशिकला Su-57 साठी विशेष उत्पादन केंद्र (हब) बनवू इच्छित आहे. येथे आधीपासूनच रशियन विमानांवर काम करण्याचा अनुभव असल्याने, खर्च आणि वेळ दोन्ही कमी होऊ शकतात. मात्र, यासाठी नवीन असेंब्ली लाईन, कंपोझिट मटेरियल सुविधा, सॉफ्टवेअर लॅब आणि स्टेल्थ कोटिंग यंत्रणा उभारावी लागेल. या प्रकल्पाची सुरुवात सेमी-नॉक्ड डाउन किट्स पासून होणार असून, टप्प्याटप्प्याने भारतीय सहभाग वाढवण्याचा प्रस्ताव आहे. हा मॉडेल यापूर्वी Su-30MKI प्रकल्पातही वापरण्यात आला होता.

IAF सावध का?

IAF या मोठ्या योजनेबाबत सावध आहे, कारण तातडीच्या गरजांसाठी जलद खरेदी आवश्यक आहे. आधीपासून अनेक प्रकल्प सुरू आहेत ज्यात १८० तेजस Mk1A आणि सुमारे १२० तेजस Mk2चा समावेश आहे. याशिवाय, MRFA आणि AMCA प्रकल्पांचा दबाव आहे, ज्या अंतर्गत ११४ आधुनिक फायटर विमानांची खरेदी प्रस्तावित आहे. यासोबतच, AMCA प्रकल्पांतर्गत २०३० नंतर १२०+ स्वदेशी स्टेल्थ फायटर विकसित करण्याचे लक्ष्य आहे. अशा परिस्थितीत, Su-57 वर मोठी गुंतवणूक केल्यास AMCA प्रकल्पावर परिणाम होऊ शकतो.

तंत्रज्ञान हस्तांतरण निर्णायक ठरणार

रशिया या डीलमध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान हस्तांतरण देण्यास तयार आहे, ज्यामध्ये सोर्स कोडपर्यंत प्रवेश, स्थानिक प्रणाली समाकलन आणि भविष्यात भारतीय तंत्रज्ञान समाविष्ट करण्याची मुभा. पश्चिमी देशांकडून सहसा न मिळणाऱ्या या सवलतीमुळे हा प्रस्ताव अधिक आकर्षक ठरू शकतो. याबाबत आता सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title : रूस ने भारत को 100 Su-57 लड़ाकू विमानों का प्रस्ताव दिया; नासिक में उत्पादन?

Web Summary : रूस ने भारत को नासिक में 100 Su-57 जेट विमान बनाने का प्रस्ताव दिया, वायुसेना को मजबूत करने के लिए तकनीक हस्तांतरण की पेशकश की। भारत स्वदेशी कार्यक्रमों और बजट बाधाओं के बीच इस पर विचार कर रहा है, जो भविष्य की रक्षा रणनीति को प्रभावित करेगा।

Web Title : Russia offers India 100 Su-57 fighter jets; Nashik production?

Web Summary : Russia proposes producing 100 Su-57 jets in Nashik, offering tech transfer to bolster India's air force. India weighs this against indigenous programs amid fighter jet shortages and budgetary constraints, impacting future defense strategy.