धाराशिव: पुतण्या धनंजय सावंत यांचा काका तानाजी सावंत यांना धक्का, जवळा गटातून दणदणीत विजय
धनंजय सावंत यांनी जवळा येथे त्यांचे काका, माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पराभव केला. भाजप समर्थित अपक्ष म्हणून लढताना धनंजय यांनी २१०० मतांनी विजय मिळवला. या स्पर्धेत जोरदार खटके उडाले, तानाजी यांच्या शेरेबाजीमुळे धनंजय यांनी फायदा घेतला, ज्यामुळे शिंदे सेनेला फटका बसला.
छत्रपती संभाजीनगर: सिग्नल तोडल्याने पोलिसांना मारहाण; बापलेकांचा चौकात राडा!
छत्रपती संभाजीनगरमध्ये सिग्नल तोडल्याने थांबवलेल्या वाहतूक पोलिसांना बापलेकांनी मारहाण केली. शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणल्याने तिघांना अटक. फेब्रुवारीपासून पोलिसांवरील हल्ल्याची ही सहावी घटना आहे, त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
व्यापार: हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
हवाई प्रवास अधिक स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या Aviation Turbine Fuel (ATF) संदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यात आले असून, आता त्यामध्ये सिंथेटिक इंधन आणि इथेनॉल मिसळण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम हवाई प्रवासाच्या खर्चावर, एअरलाईन्सच्या ऑपरेटिंग खर्चावर आणि पर्यावरणावर होण्याची शक्यता आहे.
हिंगोली: वसमत तालुक्यात पुन्हा भूकंप; महिन्यात तिसऱ्यांदा हादरा!
हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का, एप्रिलमधील तिसरा. मोठ्या आवाजाने आणि हादर्याने भीतीचे वातावरण. कोणतीही जीवितहानी नाही. यापूर्वी ११ एप्रिल रोजी झालेल्या धक्क्यांमुळे घरांना तडे गेले, आणखी नुकसानीची भीती. प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले; भूगर्भीय सर्वेक्षणाची मागणी.
व्यापार: 'नो-कॉस्ट' EMI चे जाळे; खरंच यात व्याज आकारले जात नाही का? जाणून घ्या...
आजच्या डिजिटल युगात क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शॉपिंगवरील डिस्काउंट, कॅशबॅक आणि EMI सुविधेमुळे ग्राहकांना महागड्या खरेदी सहज करता येतात. विशेषतः Zero Interest EMI (नो-कॉस्ट EMI) ही सुविधा लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. मात्र, ही EMI सुविधा खरोखरच ‘बिनव्याजी’ असते का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
व्यापार: एअरटेलचे रिचार्ज महागले; ७९९ चा प्लॅन बंद, ८५९ चा प्लॅन महागला
यावर्षी रिचार्ज प्लान महाग होऊ शकतात अशी चर्चा होती आणि आता एअरटेलनं त्याची सुरुवात केल्याचं दिसत आहे. एअरटेलनं आपल्या ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटी असलेल्या प्लान्समध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. कंपनीनं केवळ काही स्वस्त प्लॅन्स बंदच केले नाहीत, तर आधीपासून अस्तित्वात असलेले प्लॅन्स महागही केले आहेत.
व्यापार: ओला इलेक्ट्रिक शेअर्समध्ये ६५ टक्क्यांची वाढ; आणखी तेजी येणार का?
नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ सुरू होताच ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी NSE वर हा शेअर ₹२२.८० वर बंद झाला होता, जो आता सुमारे ₹३८.१० प्रति शेअरवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या महिन्यातच या शेअरमध्ये ६५% पेक्षा अधिक वाढ झाली आहे.
व्यापार: ₹५९० कोटींची डिफेन्स ऑर्डर मिळताच 'या' मिनीरत्न कंपनीचे शेअर बनले रॉकेट, तुमच्याकडे आहे का?
Miniratna Company: सार्वजनिक क्षेत्रातील 'मिनीरत्न' कंपनी BEML च्या शेअर्समध्ये बुधवारी मोठी वाढ पाहायला मिळाली. BSE वर इंट्राडे ट्रेडिंगदरम्यान शेअर ८% पेक्षा अधिक वाढत १९११.५० रुपयांवर पोहोचला. संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या नव्या ऑर्डरमुळे या शेअर्समध्ये ही तेजी आली आहे.
व्यापार: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; काय आहे नवी किंमत?
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज बुधवार २२ एप्रिल रोजी सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम १०५ रुपयांची घट झाली असून चांदी प्रति किलो ८३६ रुपयांनी स्वस्त झाली आहे. आता चांदीचा दर २,४९,६७७ रुपये प्रति किलोवर आला आहे
छत्रपती संभाजीनगर: छ. संभाजीनगर हादरले: बजाजनगरात महिलेने महिलेचा खून, परिसरात खळबळ
बजाजनगरमध्ये 40 वर्षीय साधना सोनपेटकर यांची घरात घुसून हत्या. पोलिसांनी शैला सोनार (45) यांना अटक केली. हल्ल्यात चाकुचा वापर. वैयक्तिक वादातून हत्या झाल्याचा संशय; तपास सुरू.
व्यापार: पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
भारताच्या ऊर्जा धोरणात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतात सध्या E20 (२०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल) उपलब्ध असून, केंद्र सरकार आता १००% इथेनॉल ब्लेंडिंगकडे (E100) वाटचाल करण्याचा विचार करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत मोठे संकेत देत, ऊर्जा स्वावलंबन हे आता केवळ पर्यावरणीय नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेचेही महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय: होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ३० देश एकवटले: भारताची भूमिका काय?
ब्रिटन आणि फ्रान्सच्या नेतृत्वाखाली, अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज सामुद्रधुनी सुरक्षित करण्यासाठी तीस देश एकत्र आले आहेत. सुरक्षित मार्ग सुनिश्चित करण्यासाठी लंडनमध्ये लष्करी योजनांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. भारताच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जागतिक तेल पुरवठा स्थिर करणे हे उद्दिष्ट आहे.
फिल्मी: न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल
अभिनेत्री ज्योती सक्सेनाच्या इन्स्टाग्राम चॅटने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीचे एका विद्यार्थ्यासोबतच्या कथिच चॅटचे काही स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. या चॅटमध्ये ज्योती सक्सेनाने न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार रुपयाची मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. समोरच्या व्यक्तीने विद्यार्थी असल्याचं सांगितल्यानंतर ज्योती सक्सेनाने रक्कम कमी करून ८ हजार रुपयांची मागणी केल्याचं म्हटलं जात आहे. ज्योती सक्सेनाच्या चॅटचे हे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
व्यापार: IT सेक्टरला मोठा धक्का; HCL, Infosys, TCS चे शेअर कोसळले, घसरणीचे कारण काय..?
आयटी शेअर्समध्ये बुधवारी(दि.२२) मोठी घसरण पाहायला मिळाली. HCL Technologies च्या अपेक्षेपेक्षा कमजोर तिमाही निकालांमुळे संपूर्ण आयटी सेक्टरवर दबाव निर्माण झाला. याचा परिणाम Infosys आणि Tata Consultancy Services सारख्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सवरही दिसून येत आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.
व्यापार: GenZ कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी बदलण्याचा वाढता ट्रेंड; कंपन्यांची ४०% भरती फक्त रिप्लेसमेंटसाठी...
भारतातील तरुण कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी वारंवार बदलण्याचा (जॉब-हॉपिंग) ट्रेंड झपाट्याने वाढतोय. Quess Corp च्या अहवालानुसार, Gen Z कर्मचाऱ्यांचा एका कंपनीत टिकण्याचा कालावधी सरासरी २४ महिन्यांपेक्षा कमी झाला आहे. यामुळे कंपन्यांना नव्या पदांपेक्षा रिक्त झालेल्या जागा भरण्यावरच अधिक भर द्यावा लागत आहे.
छत्रपती संभाजीनगर: मित्रांचा घात: छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून गुन्हेगाराची हत्या
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका २५ वर्षीय तरुणाची, रोहित मस्के, जुन्या वादातून मित्रांनी निर्घृण हत्या केली. मेहरसिंग नाईक महाविद्यालयाजवळ चाकूने वार करण्यात आले. पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. मृतावर गुन्हे दाखल होते, ज्यामुळे टोळीयुद्धाची भीती वाढली आहे.
राष्ट्रीय: ‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जर्मनी दौऱ्यात पाकिस्तानवर जोरदार टीका केली. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, आपले सर्व शेजारी देश चांगले आहेत, फक्त एक अपवाद आहे. यावेळी त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत त्याच्या यशाबद्दल अधिक सांगण्याची गरज नसल्याचेही नमूद केले.
धाराशिव: लेकीच्या लग्नाआधी बापाचा वीज कोसळून दुर्दैवी अंत!
कडब्याची गंजी झाकताना वीज कोसळून बबन लांडगे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलीचे लग्न आठ दिवसांवर होते. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
व्यापार: ₹५०० च्या नोटेच्या छपाईसाठी किती खर्च येतो, कुठे छापल्या जातात नोटा?
आपण आपल्या दैनंदिन जीवनात ५०० रुपयांच्या नोटेचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो, परंतु ही नोट नेमकी कशी बनते आणि ती छापण्यासाठी किती खर्च येतो याचा कधी विचार केला आहे का? नुकतीच रिझर्व्ह बँकेनं (RBI) या प्रक्रियेबद्दल महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
व्यापार: सोनं-चांदी महागले; आणखी वाढणार भाव? आजचे ताजे दर पाहा
मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर २२ एप्रिल २०२६, बुधवार रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. जागतिक कमोडिटी बाजारात आज सकाळपासूनच वाढ नोंदवली जात असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या युद्धविरामाला मुदतवाढ दिल्याची घोषणा केल्यामुळे ही दरवाढ झाली.
व्यापार: RBI चा नियम : ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) मंगळवारी डिजिटल पेमेंट प्रक्रिया सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार, जर एखाद्या ग्राहकाचं कार्ड पुन्हा जारी म्हणजेच रिइश्यू झालं, तर जुन्या कार्डवर सुरू असलेले ई-मँडेट नवीन कार्डवर आपोआप ट्रान्स्फर केले जाऊ शकतील.
आंतरराष्ट्रीय: महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष
जेन झी आंदोलनानंतर नेपाळमध्ये झालेल्या निवडणुकीतून सत्तेवर आलेल्या बालेन शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. मात्र बालेन शाह यांच्या सत्ता स्थापनेला महिना लोटत नाही तोच त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात आंदोलनांना सुरुवा झाली आहे. राजधानी काठमांडूपासून सत्तेचं केंद्र असलेल्या सिंहदराबारपर्यंत विरोधाचे आवाज उमटू लागले आहेत.
फिल्मी: "आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
राज्यात ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषाप्रवीणता अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात ऑटो रिक्षा चालक - मालक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. निर्णय मागे न घेतल्यास ४ मेपासून तीव्र आंदोलनाचा इशारा युनियननं दिला आहे. यावर मराठी अभिनेता हेमंत ढोमेनं प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत सुनावले आहे.
क्रिकेट: SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! ऑरेंज आर्मी समोर दिल्लीकर ठरले हतबल
अभिषेक शर्माच्या विक्रमी शतकी खेळीनंतर एशान मलिंगा आणि हर्ष दुबे यांनी अचूक टप्प्यावर केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने घरच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सला ४७ धावांनी पराभूत केले. ऑरेंज आर्मीनं सेट केलेल्या २४३ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून नितीश राणाच्या अर्धशतकाशिवाय समीर रिझवी वगळता कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १९५ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
क्रिकेट: अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर रंगलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याने यंदाच्या हंगामातील पहिले आणि आयपीएलमधील दुसरे शतक साजरे केले. दिल्लीकरांची धुलाई करताना अभिषेक शर्मानं १० चौकार आणि १० षटकाराच्या मदतीने नाबाद १३५ धावांची खेळी साकारली. या कामगिरीसह टी-२० क्रिकेटमध्ये चार वेळा १३० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विश्वविक्रम त्याने आपल्या नावे केला आहे.
छत्रपती संभाजीनगर: अनास्था! छ. संभाजीनगर-नागपूर रेल्वे नाही, २४ तास ११४ ट्रॅव्हल्सचेच राज्य.
छ. संभाजीनगरहून नागपूरसाठी थेट रेल्वे नाही; प्रवासी महागड्या खाजगी ट्रॅव्हल्सवर अवलंबून. दररोज ११४ ट्रॅव्हल्स बस धावतात. बंद केलेल्या गाड्यांमुळे स्थिती गंभीर, राजकीय अनास्था उघड. रेल्वे मार्गांची मागणी वाढली.
धाराशिव: जात पंचायतीचा अजब न्याय: देव कोपला, मायलेकरांना मारहाण, लाखोंचा दंड
धाराशिवमध्ये जात पंचायतीने एका महिलेस व मुलास देव कोपल्याच्या कारणावरून मारहाण केली, तसेच २.५५ लाखांचा दंड ठोठावला व ६० हजार रुपये उकळले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बीड: बीड एसीबीची कारवाई: महावितरणच्या महिला अभियंता लाच घेताना अटकेत
बीडमध्ये, सौर ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी १८ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला एसीबीने रंगेहाथ पकडले. या अटकेमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.
पुणे: पुण्यात थरार..! आप्पा बळवंत चौकात धडक, बस थेट दुकानात;सुदैवाने जीवितहानी नाही
पुणे - शहरातील मध्यवर्ती व गजबजलेल्या आप्पा बळवंत चौकात आज दुपारी एक धक्कादायक अपघात घडला. भरधाव वेगात येणारी पीएमपीएल बस अचानक नियंत्रण सुटून थेट एका दुकानात घुसली. या अपघातात दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, लाखो रुपयांची हानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
व्यापार: पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा
पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँके 'वेट अँड वॉच' या भूमिकेत असल्याचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना गव्हर्नर मल्होत्रा यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाईवर दुय्यम परिणाम होऊ शकतात. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना सावध भूमिका आवश्यक आहे.
परभणी: शेतशिवारात अनोळखी जोडप्याचा मृत्यू, गूढ वाढले!
परभणीतील पिंपळगाव ठोंबरे येथे एका झाडाला अनोळखी जोडप्याचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. दुर्गंधीमुळे प्रकार उघडकीस, अंदाजे आठवडाभरापूर्वीची घटना. आत्महत्या की घातपात? पोलीस तपास करत आहेत, मृतांची ओळख पटलेली नाही.