Miniratna Company: सार्वजनिक क्षेत्रातील 'मिनीरत्न' कंपनी BEML च्या शेअर्समध्ये बुधवारी मोठी वाढ पाहायला मिळाली. BSE वर इंट्राडे ट्रेडिंगदरम्यान शेअर ८% पेक्षा अधिक वाढत १९११.५० रुपयांवर पोहोचला. संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या नव्या ऑर्डरमुळे या शेअर्समध्ये ही तेजी आली आहे.
५९० कोटींची डिफेन्स ऑर्डर
BEML ला भारतीय लष्करासाठी T-72 tank आणि T-90 tank टँकवर बसवण्यात येणाऱ्या ट्रॉल असेंब्लीज पुरवण्याचा सुमारे ५९० कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. या करारामुळे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात कंपनीची स्थिती अधिक मजबूत झाली आहे.
ट्रॉल असेंब्ली म्हणजे काय?
ट्रॉल असेंब्ली हे महत्त्वाचे संरक्षण उपकरण असून ते DRDO ने विकसित केले आहे. हे उपकरण अँटी-टँक माईन्स निष्क्रिय करण्यासाठी वापरले जाते. प्रॉक्सिमिटी मॅग्नेटिक फ्यूज असलेल्या माईन्सही हे क्लिअर करू शकते. तसेच, माइन-प्रभावित भागात आर्मर्ड वाहनांसाठी सुरक्षित मार्ग तयार करण्यात याचा मोठा उपयोग होतो.
शेअर्समध्ये दीर्घकालीन दमदार कामगिरी
BEML च्या शेअर्सनी गेल्या काही वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे:
५ वर्षांत: २८५% पेक्षा जास्त वाढ
४ वर्षांत: १५०% पेक्षा अधिक वाढ
३ वर्षांत: २१०% पेक्षा जास्त वाढ
१ वर्षात: २०% पेक्षा जास्त वाढ
१ महिन्यात: ३०% पेक्षा जास्त वाढ
२३ एप्रिल २०२१ रोजी ४७४.८४ रुपये असलेला शेअर आज, २२ एप्रिल २०२६ रोजी १९११.५० रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २४३७.४३ रुपये आहे, तर नीचांक १३६१.१० रुपये आहे. दरम्यान, कंपनीने नोव्हेंबर २०२५ मध्ये १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअर्सचे ५-५ रुपयांच्या दोन भागांत विभाजन केले होते.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
