महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 10:54 IST2026-04-22T10:03:49+5:302026-04-22T10:54:28+5:30

Nepal News: जेन झी आंदोलनानंतर नेपाळमध्ये झालेल्या निवडणुकीतून सत्तेवर आलेल्या बालेन शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. मात्र बालेन शाह यांच्या सत्ता स्थापनेला महिना लोटत नाही तोच त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात आंदोलनांना सुरुवा झाली आहे.

Within a month, public outrage against the Balen Shah government in Nepal, displeasure over 'these' two issues | महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी

महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी

जेन झी आंदोलनानंतर नेपाळमध्ये झालेल्या निवडणुकीतून सत्तेवर आलेल्या बालेन शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. मात्र बालेन शाह यांच्या सत्ता स्थापनेला महिना लोटत नाही तोच त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात आंदोलनांना सुरुवा झाली आहे. राजधानी काठमांडूपासून सत्तेचं केंद्र असलेल्या सिंहदराबारपर्यंत विरोधाचे आवाज उमटू लागले आहेत. याददरम्यान, हजारो शालेय विद्यार्थी शाळेच्या गणवेशातच आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले. तसेच सरकार संवादापेक्षा दडपशाही भूमिका अवलंबत आहे. तसेच विद्यार्थी संघटनांना महत्त्व देत नसल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे.  

याशिवाय भारतातून १०० रुपयांहून अधिक सामान आणल्यास त्यावर अनिवार्यपणे कस्टम ड्युटी लावण्याच्या निर्णयाविरोधात सीमेवरील भागातील लोकांमध्ये नाराजी आहे. तसेच सरकारचं हे धोरण सर्वसामान्य जनतेवर अनावश्यक ओझं टाकणारं असल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे.

याबरोबरच नवनिर्वाचित सरकारमधील गृहमंत्री सुदन गुरुंग यांच्याविरोधातही आंदोलक आक्रमक झाले आहेत... तसेच बेकायदेशीर मालमत्ता आणि संशयास्पद व्यवहारांमुळे त्यांच्या राजीनामाच्या मागणीने जोर धरला आहे. नेपाळमधील प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार गृहमंत्री सुदन गुरुंग यांच्यावर ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती गोळा करणे, शेअर बाजारामध्ये दलालांच्या मदतीने संशयास्पद व्यवहार करणे असे आरोप करण्यात येत आहेत. सरकार लोकविरोधी धोरणे लादत आहे, असा आरोपही राजकीय पक्ष आणि आंदोलकांकडून केला जात आहे. 
 

Web Title : नेपाल: बालेन शाह सरकार को नीतियों पर एक महीने में ही विरोध का सामना।

Web Summary : बालेन शाह की नेपाल सरकार को सीमा शुल्क और गृह मंत्री के कथित भ्रष्टाचार सहित नीतियों पर विरोध का सामना करना पड़ रहा है। छात्र और नागरिक असंतोष व्यक्त कर रहे हैं।

Web Title : Nepal: Balen Shah government faces backlash within a month over policies.

Web Summary : Balen Shah's Nepal government faces protests over policies including customs duties and alleged corruption of the Home Minister. Students and citizens are voicing discontent.