अनंत चतुर्दशीची ती काळोखी पहाट आठवली, तर आजही अंगावर शहारे उभारतात. त्यावेळी ‘लोकमत’च्या सोलापूर युनिटचे काम चालू होते. रात्री एकच्या सुमारास मी सोलापूरहून उस्मानाबादला पोहोचलो होतो. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीचा गोंगाट २.३० च्या दरम्यान संपून थोडासा
...
. पाच ते दहा मिनिटांनी पुन्हा जमीन थरथरली आणि काळजाचा थरकाप होणारा आवाज झाला. बीड शहरात त्या काळात नवीनच टीव्हीचे जाळे सुरू झाले होते. तरीही किल्लारी परिसरात भूकंप झाल्याची बातमी धडकली ती रेडिओवरूनच.
...
प्रेतरूप झालेल्या या माणसांच्या आतील माणूस जिवंत करणे हे महाकठीण काम सर्वांवर येऊन पडले होते. एकट्या प्रशासनाला ही जबाबदारी पेलणे शक्य नव्हते. येथेही लोकमतने आपले योगदान दिले.
...
३० सप्टेंबर १९९३ ची ती काळजाचा ठोका चुकवणारी पहाट. किल्लारी आणि परिसरात भूकंपाने क्षणार्धात होत्याचं नव्हतं केलं होतं. राजेंद्र दर्डा यांनी त्याचक्षणी वेगाने सूत्रे हलवायला सुरुवात केली. लोकमतची यंत्रणा सतर्क केली. तातडीनं सामाजिक, स्वयंसेवी संस्था-स
...