तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं

अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार सामन्यात तिलक वर्मानं जिंकून दिली मॅच

By सुशांत जाधव | Updated: May 14, 2026 23:38 IST2026-05-14T23:35:18+5:302026-05-14T23:38:01+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 PBKS vs MI Tilak Varma and a cameo from Will Jacks helped Mumbai Indians defeat Punjab Kings by six wickets in Dharamsala | तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं

तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं

तिलक वर्माची दमदार अर्धशतकी खेळी आणि अखेरच्या षटकात विल जॅक्सच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्सला पराभवाचा धक्का दिला. मुंबई इंडियन्सचा संघ आधीच स्पर्धेबाहेर पडला आहे. पण जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली पहिला विजय नोंदवत त्यांनी पंजाब किंग्सचा प्लेऑफ्सचा मार्ग खडतर केला आहे. श्रेयस अय्यरच्या संघाने सलग पाच सामने गमावले आहेत. प्लेऑफ्सचं तिकीट मिळवण्यासाठी आता उर्वरित दोन्ही सामने जिंकण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार सामना; तिलक वर्मानं षटकार मारत संपवली मॅच

अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सच्या संघाला १५ धावांची आवश्यकता होती. श्रेयस अय्यरनं चेंडू बार्टलेटच्या हाती सोपवला. पहिल्याच चेंडूवर विल जॅक्सनं उत्तुंग षटकार मारला. त्यानंतर एक धाव घेत त्याने स्ट्राइक सेट झालेल्या तिलक वर्माला दिले. बार्टलेटनं  तिसरा चेंडू निर्धाव टाकत तिलक वर्मावरील दबाव वाढवला. पण चौथ्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारत तिलक वर्मानं मुंबई इंडियन्सला विजयाचा अगदी जवळ नेले. अखेरच्या २ चेंडूत २ धावांची गरज असताना तिलक वर्मानं षटकार मारून मॅच संपवली. 

प्रभसिमरनचं अर्धशतक,  पंजाबनं सेट केलं होतं २०१ धावांचे टार्गेट

सलामीवीर प्रभसिमरन सिंग याने ३२ चेंडूत ६ चौकार आणि ४ चौकाराच्या मदतीने केलेल्या ५७ धावांच्या खेळीनंतर अखेरच्या षटकात अझमतुल्लाह ओमरझाई १७ चेंडूत केलेल्या ३८ धावा आणि इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मैदानात उतरलेल्या विष्णु विनोदनं ८ चेंडूत नाबाद १५ धावांसह बार्टलेटनं ७ चेंडूत केलेल्या उपयुक्त १८ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर निर्धारित पंजाब किंग्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात २०० धावा करत मुंबई इंडियन्ससमोर २०१ धावांचे टार्गेट सेट केले होते.  MI कडून  शार्दुल ठाकूरनं गोलंदाजीत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय दीपक चाहरने २ तर कॉर्बिन बॉश आणि राज बावा यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.

रायन रिकल्टनंची दमदार सुरुवात, तिलक- विल जॅक्सनं शेवट केला गोड

या धावसंख्येचा पाठलाग करताना रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा जोडीनं पहिल्या विकेटसाठी ३९ चेंडूत ६१ धावांची भागीदारी रचत दमदार सुरुवात केली. रिकल्टन २३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने २३ चेंडूत ४८ धावांवर बाद झाला. त्याचे अर्धशतक २ धावांनी हुकले. ओमरझाईनं पंजाबला पहिले यश मिळवून दिले. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या नमन धीर ९ धावा करून माघारी फिरला. मार्को यान्सेन याने त्याची विकेट घेतली. रोहित शर्माच्या रुपात युझवेंद्र चहलनं संघाला आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. रोहितनं २६ चेंडूत फक्त २५ धावा केल्या.  संघ अडचणीत असताना तिलक वर्मानं दमदार खेळीचा नजराणा पेश केला.  ३३ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने ७५ धावांची नाबाद खेळी साकारली. दुसऱ्या बाजूला विल जॅक्सनं १० चेंडूत २ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने २५ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पंजाबकडून गोलंदाजीत ओमरझाईनं २ तर मार्को यान्सेन आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

Web Title : तिलक वर्मा का छक्का! रोमांचक मुकाबले में मुंबई इंडियंस की जीत।

Web Summary : तिलक वर्मा के अर्धशतक और विल जैक्स की बल्लेबाजी से मुंबई इंडियंस ने पंजाब किंग्स को हराया, जिससे उनकी प्लेऑफ की उम्मीदें खतरे में पड़ गईं। मुंबई ने पंजाब द्वारा दिए गए 201 रनों के लक्ष्य का पीछा किया।

Web Title : Tilak Varma's six wins it! MI defeats PBKS in thriller.

Web Summary : Tilak Varma's fifty and Will Jacks' hitting led MI to victory over PBKS, jeopardizing their playoff hopes after a fifth straight loss. Mumbai chased down a target of 201 set by Punjab.