भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 22:04 IST2026-05-14T22:03:52+5:302026-05-14T22:04:55+5:30
ब्रिटनच्या सागरी सुरक्षा यंत्रणेने (UKMTO) गुरुवारी (१४ मे २०२६) दिलेल्या माहितीनुसार, "आपल्याला संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) फुजैराह बंदरापासून ३८ नॉटिकल मैल अर्था सुमारे ७० किलोमीटर अंतरावर ईशान्य दिशेला एका जहाजावर कब्जा झाल्याची सूचना मिळाली आहे.

भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
पश्चिम आशियामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' मध्ये सातत्याने नवनव्या घटना घडामोडी घडत आहेत. ओमानच्या किनाऱ्याजवळ बुधवारी (१३ मे २०२६) भारतीय ध्वज असलेल्या एका जहाजावर ड्रोन हल्ले करून ते बुडवण्यात आले. या घटनेचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र निषेध नोंदवत, सागरी जहाजांवरील असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे. महत्वाचे म्हणजे, ही घटना घडून २४ तासही होत नाहीत, तोच आणखी एका जहाजाचे अपहरण झाल्याचे वृत्त आहे. हे जहाज इराणच्या दिशेने केल्याचे वृत्त आहे.
नांगर टाकून उभ्या असलेल्या जहाजावर कब्जा -
ब्रिटनच्या सागरी सुरक्षा यंत्रणेने (UKMTO) गुरुवारी (१४ मे २०२६) दिलेल्या माहितीनुसार, "आपल्याला संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) फुजैराह बंदरापासून ३८ नॉटिकल मैल अर्था सुमारे ७० किलोमीटर अंतरावर ईशान्य दिशेला एका जहाजावर कब्जा झाल्याची सूचना मिळाली आहे. या जहाजाच्या नावासंदर्भातअद्याप कसलीही माहिती समजू शकलेली नाही. हे जहाज स्ट्रेट ऑफ होर्मुजजवळ समुद्रात नांगर टाकून उभे होते. या जहाजार काही अनधिकृत कोलांनी कब्जा केला असून आता ते इराणच्या सागरी हद्दीकडे नेले जात आहे."
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका
गुजरातचे 'हाजी अली' नावाचे एक मालवाहू जहाज बुधवारी पहाटेच्या सुमारास ओमानच्या उत्तर किनाऱ्याजवळील लिमा भागातून जात होते. याचवेळी त्या जहाजावर ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यामुळे जहाजाला भीषण आग लागली आणि हे जहाज समुद्रात बुडाले. यावर तीव्र प्रतिक्रिया देत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, "भारतीय जहाजावरील हा हल्ला अस्वीकार्य आहे. व्यावसायिक आणि सामान्य जहाजांना लक्ष्य केले जाणे चिंताजनक आहे. जहाजावरील सर्व भारतीय क्रू सदस्य सुरक्षित आहेत. त्यांना वाचवल्याबद्दल त्यांनी ओमानच्या अधिकाऱ्यांचे आभारही मानले आहेत.