शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘एकटीचा अनुभव’ सांगण्यासाठी महिला सरसावल्या!

By admin | Updated: January 19, 2015 00:20 IST

‘स्टिंग आॅपरेशन’चे भरभरुन स्वागत : रात्रीच्या सुरक्षिततेबद्दल तीव्र भावना प्रकटल्या

सातारा : माहुली परिसरात एका अभागी महिलेवर सामूहिक अत्याचारानंतर तिचा खून झाला. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शुक्रवारी मध्यरात्री तीन ठिकाणी धाडसी स्टिंग आॅपरेशन केले. या आॅपरेशनमुळे समाजातील काही विकृत प्रवृत्ती चव्हाट्यावर आली. या स्टिंग आॅपरेशनमुळे महिलांचे धाडस वाढले असून आजवर गप्प बसलेल्या महिला बोलायला लागल्या आहेत.शहरातील मुख्य बसस्थानक, क्रीडा संकुल, जिल्हा परिषद, गोडोली नाका आणि भूविकास बँक परिसरात ‘लोकमत’ ने शुक्रवारी रात्री ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. ज्या सातारकरांच्या विश्वासार्हतेच्या शपथा घेतल्या जात होत्या, त्या शहरातील सामाजिक स्वास्थ्य किती बिघडले आहे, हे या स्टिंग आॅपरेशनमधून स्पष्ट झाले आहे. रात्री दहानंतर महिला किती असुरक्षित आहेत, ही यामुळे उघडकीस आले.सातारा शहराबरोबरच पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील पंढरपूर फाटा, खटाव तालुक्यातील पुसेगाव येथेही एकाच वेळी ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. प्रत्येक ठिकाणचा अनुभव कमीअधिक प्रमाणात सारखाच होता. यामुळे आदर्शवादाच्या गप्पा मारणाऱ्या समाजाचे दुसरे चित्रहीसमोर आले. हाच अनुभव समाजातील अनेक महिलांना यापूर्वी आला. ‘लोकमत’ केलेल्या धाडसाचे दिवसभर विविध स्तरातून कौतुक होत होते. त्याचप्रमाणे ही बातमी आवर्जून वाचण्यास मैत्रिणींना सांगितले जात होते. त्याचप्रमाणे या बातमीची पोस्ट व्हॉट्सअ‍ॅपवरून विविध गु्रपवरून फिरवल्या जात होत्या. (प्रतिनिधी)


परगावाहून कधी रात्री उशिरा येण्याचा योग आलाच तर नऊनंतर कधीही एकटी घरी जाऊ शकत नव्हती. अनेकदा वाईट अनुभव आले. त्यामुळे घरी फोन करून कुटुंबीयांना बोलावून घेत होते. नातेवाईक येईपर्यंत बसस्थानकातच थांबावे लागत होते.
- यामिनी जोशी,
एसटीचे तत्कालीन अधिकारी

रात्रीच्या वेळी महिला सातारा शहरात सुरक्षित नाहीत, ही वस्तुस्थिती ‘लोकमत’ने धाडसाने मांडली. महिलांच्या मनातील ही भावना ‘लोकमत’ने पुढे आणल्यामुळे अनेक ठिकाणी सुधारणा होणे अपेक्षित आहे. पुरुषांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.
- सरिता बाबर, सातारा

सातारा महिलांसाठी सुरक्षित आहे हा फुगा ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमुळे फोडला. यात उल्लेख केलेल्या अनेक गोष्टींचा अनुभव शहरातील महिलांनी घेतला आहे. पण अब्रू जाईल या भीतीने त्या पुढे येत नव्हत्या. महिला अशा मानसिकते विरोधात आवाज उठविला पाहिजे.
- चारुशीला मोहिते, सातारा

एसटी स्टँड तसेच सार्वजनिक ठिकाणी महिलांना विशेषत: मुलींना होणारा त्रास ही बाब नित्याचीच होत चालली आहे. ‘लोकमत’ने हेल्पलाईन सुरू करून सर्व महिला वर्गाला एक प्रकारे आधार देण्याचे काम केले आहे.
- संध्या जोशी,
अभिनव महिला मंडळ अध्यक्षा , खटाव

मी नोकरी करते, तसेच माझ्यासारख्या असंख्य महिला रोज नोकरीनिमित्त घराबाहेर असतात. त्या सर्वांच्या कुटुंबीयांना त्या घरी पोहोचेपर्यंत लागणारी काळजी पाहता आज समाजात महिला सुरक्षित आहेत का,असा प्रश्न नेहमी येतो.
- प्रा. वहिदा इनामदार,
खातगुण