शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 16:30 IST

Phaltan Doctor Sushma Andhare: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव घेत गंभीर आरोप केले आहेत.

Phaltan Doctor Sushma Andhare News: "एखाद्या गावात आपण राहतो, तिथे आपले घर असते; तेव्हा आपण हॉटेलवर राहत नाही. डॉक्टर तरुणी त्या रात्री एक वाजता हॉटेलमध्ये गेली कशी? हॉटेल मधुदीपमध्ये डॉक्टर तरुणीला प्रवेश कसा दिला गेला? तिला कायदेशीर पद्धतीने प्रवेश दिला गेला होता का? सगळी कागदपत्रे होती का? ते सगळे कागपदत्रे ते घेऊन गेले असे सांगत आहेत", असे प्रश्न उपस्थित करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडून ऊसतोड मजुरांवरही अत्याचार केले जात असल्याचा आरोप केला. 

डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणावर त्या म्हणाल्या की, "वैष्णवी हगवणे प्रकरणातही हेच झाले होते. त्या महिलेने आत्महत्या केली आणि तिचे चारित्र्य हनन केले गेले. तेच आता डॉक्टर तरुणीच्या प्रकरणात सुरू आहे. तिचे चारित्र्य चांगले नव्हते, ती कुणाला तरी भेटत होती. तिचे संबंध होते, असे गलिच्छ आरोप केले जात आहेत. एखादी व्यक्ती मेल्यानंतर तुम्ही त्याचे चारित्र्य हनन करत आहात, हे करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे", असा संताप सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला. 

डॉक्टर तरुणीचा मृतदेह सापडला ते हॉटेल कुणाचे?

"हे हॉटेल कुणाचे आहे, ते जरा सांगितले पाहिजे", असे म्हणत सुषमा अंधारे यांनी एक फोटो दाखवला, ज्यात भोसले, जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर दिसत आहेत. अंधारे म्हणाल्या, "हे हॉटेल भोसले नावाच्या माणसाचे आहे. हा भोसले कोण, रणजितसिंह नाईक निंबाळकर आता जेव्हा निवडणुका लढतील, तेव्हा भाजपचा संभाव्य नगराध्यक्षपदाचा हा उमेदवार आहे. यांच्या बाजूला जयकुमार गोरे दिसत आहेत. त्यांच्यावरही एका महिलेने आरोप केले आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर सगळे एका फोटोत दिसत आहेत. आणि त्याच माणसाचे हे हॉटेल आहे", असा सुषमा अंधारे म्हणाल्या. 

हॉटेलवर बोलावले गेले होते का, कशासाठी बोलावले होते?

"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं? हॉटेलवर बोलावलं होतं की, गेली होती? हॉटेलवर बोलावलं असेल, तर कशासाठी बोलावलं? जर तिची बहीण सांगतेय की, हातावरील हस्ताक्षर तिचं नाहीये, तर तिच्या हातावर कोणी लिहिले? डॉक्टर तरुणीची हत्या झाली का?", असे गंभीर प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sushma Andhare alleges BJP leader's involvement in doctor's death case.

Web Summary : Sushma Andhare accuses BJP's Ranjitsinh Naik Nimbalkar of involvement in a doctor's suspicious death at a hotel allegedly linked to him. She raises questions about why the doctor was at the hotel and alleges a cover-up, referencing a similar past case.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरDeathमृत्यूPoliceपोलिस