शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्था बुडविणारे बॅँक काय चालविणार?

By admin | Updated: April 30, 2015 00:26 IST

जावळी बॅँक निवडणूक : बिभवीतील सभासद मेळाव्यात कदमांचा मानकुमरेंना टोला

कुडाळ : ‘आम्ही भिलारे यांच्या विचारांचेच पाईक आहोत. यापुढेही त्यांचेच नेतृत्व मान्य करणार आहोत. मात्र, वसंतराव मानकुमरेंना आपली स्वत:ची पतसंस्था नीट चालविता आली नाही, ते जावळी बँक काय चालविणार. त्यामुळे त्यांनी कळंबे महाराजांनी उभ्या केलेल्या संस्थेवर दगड मारण्याचे काम करू नये. बँकेचे सभासद मानकुमरे आणि त्यांच्या पिलावळींना बँक निवडणुकीत जागा दाखवतील,’ असा टोला जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अमित कदम यांनी वसंतराव मानकुमरेंना लगावला. बिभवी, ता. जावळी येथील सभासद मेळाव्यात ते बोलत होते.जावळी बँक निवडणुकीच्या निमित्ताने हा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी विद्यमान अध्यक्ष योगेश गोळे, ज्येष्ठ संचालक यशवंतराव देशमुख, लक्ष्मण धनावडे, अविनाश कारंजकर, सुरेश दळवी, सुरेश जाधव, विठ्ठल पवार, एकनाथ चौधरी, सागर धनावडे, सुनील देशमुख, जयसिंग चिकणे, महेश देशमुख उपस्थित होते. यावेळी कदम म्हणाले, ‘ज्यांनी नेत्यांच्या विरोधात सतत भूमिका घेणाऱ्या, विरोध करणाऱ्या मंडळींचे मानकुमरे सहकार्य घेऊन बँक लढवित आहेत. त्या दीपक पवार, सदाशिव सपकाळांचे सहकार्य आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते मान्य करणार का? हा मानकुमरेंचा दुटप्पीपणा बँकेसाठी नसून राजकीय स्वार्थासाठीच आहे. योगेश गोळे म्हणले, ‘संस्था चालविण्याची धमक असावी लागते. मुंबईतही आम्ही मोठे उद्योजक ठेवीदार म्हणून आणले. त्यांनीही जावळी बँकेवर विश्वास ठेवला. कामकाजाचे कौतुक केले; परंतु आज विरोधक बँकेच्या कामकाजाव्यतिरिक्त वैयक्तिक टीका करून सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.’मेळाव्यास दक्षिण भाग, केळघर, मोरावळे, बिभवी, मेढा परिसरातील जवळपास पाचशे सभासद उपस्थित होते. (प्रतिनिधी) मानकुमरेंना होयबा संचालक हवेत ‘बँक चांगली चालली आहे. ठेवीदारांच्या ठेवींमुळे बँकेची प्रगती होत आहे. मात्र, स्वत:च्या मनमानीने बँक चालवण्यासाठी मानकुमरेंना ‘होयबा’ संचालक हवे आहेत. म्हणजे, हवी तशी बँक मोडून खाता येईल. मात्र, याला आमचा परखड विरोध राहील, ही संस्था कष्टकऱ्यांची आहे. कष्टकरी, माथाडी आमच्यासोबतच आहेत,’ असा विश्वास गोळेंनी यावेळी व्यक्त केला.