शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरची विठ्ठलदेव सोसायटी बनली ‘शिवमय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:11 IST

मलकापूर येथे विठ्ठलदेव सोसायटीत आयोजित या सोहळ्यास अ‍ॅस्ट्रॉलॉजिस्ट वृषाली दिनेश चव्हाण-पाटील, प्रिया कुलकर्णी, अर्चना चव्हाण, रोहिणी शेटेनावर, स्वाती जाधव, ...

मलकापूर येथे विठ्ठलदेव सोसायटीत आयोजित या सोहळ्यास अ‍ॅस्ट्रॉलॉजिस्ट वृषाली दिनेश चव्हाण-पाटील, प्रिया कुलकर्णी, अर्चना चव्हाण, रोहिणी शेटेनावर, स्वाती जाधव, रेखा सरपोतदार, मोहिनी करंजकर, राधिका पन्हाळे, गौरवी पाटील, शरू बेनकर, अपर्णा खुरसाने, कोमल थोरात, विशाखा जाधव, माधुरी आडलिंगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सोसायटीत महिलांच्या ‘आऊसाहेब जिजाऊ’ ग्रुपच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवयंतीनिमित्त गुरुवारी सायंकाळपासूनच सोसायटीत शिवमय वातावरण तयार झाले होते. सोसायटीत सर्वत्र भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. तसेच भगवे ध्वजही लावण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी सोसायटीत शिवकन्या शर्मिष्ठा चव्हाण हिच्या हस्ते शिवमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर शिवपराक्रमाच्या ध्वनिफित लावण्यात आल्या. शिवमूर्तीला वंदन करण्यासाठी यावेळी सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सायंकाळी पाळणा गीत म्हणून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्याचीही जय्यत तयारी करण्यात आली होती. परिसर सुशोभित करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणावर सजावट करण्यात आली होती. भगवे तोरण, भगव्या पताका तसेच भगव्या झेंड्यांमुळे सोसायटीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आकर्षक रांगोळीही रेखाटण्यात आली होती.

- चौकट

चिमुकल्या शिवांशने जिंकली मने

शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून शिवरायांच्या पराक्रमाला उजाळा देत असतानाच विठ्ठलदेव हौसिंग सोसायटीत शिवांश या चिमुकल्याने उपस्थितांची मने जिंकली. शिवांशने दांडपट्ट्यासह मर्दानी खेळाचे सादरीकरण केले. दांडपट्टा सादर करताना शिवांशची चपळाई आणि हाताची लवचिकता पाहून अनेकजण थक्क झाले.

फोटो : २०केआरडी०४, ०५

कॅप्शन : मलकापूर येथील विठ्ठलदेव हौसिंग सोसायटीत शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी फेर धरून पारंपरिक गीतांवर नृत्य सादर केले.