शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ढेबेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:32 IST

ढेबेवाडी येथे चौदा वर्षांपासून ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे. रुग्णालयाच्या नवीन सुसज्ज इमारतीत एक शस्त्रक्रिया विभाग व इतर वैद्यकीय सुविधा ...

ढेबेवाडी येथे चौदा वर्षांपासून ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे. रुग्णालयाच्या नवीन सुसज्ज इमारतीत एक शस्त्रक्रिया विभाग व इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. नियमित शंभरवर आणि मंगळवारी आठवडा बाजाराच्या दिवशी दोनशेवर येथील ओपीडी असते. त्याशिवाय मधुमेह, रक्तदाब यांच्यासह अन्य आजारांचे नियमित उपचाराखालील रुग्णही या रुग्णालयाशी जोडलेले आहेत. काही महिन्यांपासून विभागात कोरोनाचा फैलाव वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना हॉस्पिटल सुरू करण्यात आले.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. बी. डोंगरे, डॉ. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने रात्रंदिवस मेहनत घेऊन हॉस्पिटलचे कामकाज सांभाळले. कोरोना हॉस्पिटलमुळे नियमित रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात प्रवेशबंदी होती. परिणामी उपचारासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. काहींना वेळेत उपचार न मिळाल्याने गंभीर स्थिती ओढवली. सध्या कोरोनाचा फैलाव कमी झाल्याने कोरोना हॉस्पिटल बंद करून नियमित उपचार सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सुरू करण्यापूर्वी रुग्णालयाचे पूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले. रुग्णालय पूर्ववत सुरू झाल्याने उपचारास येणाऱ्या नियमित रुग्णांची संख्या हळूहळू वाढायला लागली आहे.

- चौकट

१०२ रुग्ण दाखल; ६३ कोरोनामुक्त

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नाने ग्रामीण रुग्णालयातील नियमित कामकाज बंद ठेवून ९ सप्टेंबरपासून कोरोना रुग्णालय येथे सुरू करण्यात आले होते. साडेतीन महिन्यात १०२ कोरोना बाधित रुग्ण येथे उपचारासाठी दाखल झाले. त्यातील ३६ रुग्णांना पुढील उपचारासाठी अन्यत्र पाठविण्यात आले, तर येथे उपचार घेऊन ६३ रुग्ण बरे झाले. तिघांचा मृत्यू झाला.