शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कार-ट्रकच्या धडकेत दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 18:47 IST

Accident Satara Highway- पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील सुरुर उड्डाणपूलावर उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून आलेल्या कारने धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले. हा अपघात गुरुवार, दि. २५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. केदार वेल्लळ, अजय रवींद्र सुतार अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

ठळक मुद्दे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कार-ट्रकच्या धडकेत दोन ठारउड्डाणपूलावर उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून आलेल्या कारने धडक

पाचवड : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील सुरुर उड्डाणपूलावर उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून आलेल्या कारने धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले. हा अपघात गुरुवार, दि. २५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. केदार वेल्लळ, अजय रवींद्र सुतार अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री सुरुर उड्डाणपूलावर मालट्रकचा टायर फुटल्याने तो उभा करण्यात आला होता. या उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागाहून येणाऱ्या कार (एमएच ०४ जीडी १२०५) च्या चालकाने ठोकर दिली.

यामध्ये गाडीतील केदार दत्तात्रय वेल्लळ (वय २५) व अजय रवींद्र सुतार (२७, रा. मसूर, ता. कऱ्हाड) हे दोनजण गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दोन्ही वाहने साताऱ्याचे दिशेने येत होती.अंधारातही सुरुर ग्रामस्थांनी मदतकार्य देऊन भुईंज पोलिसांना घटनास्थळी बोलवले. भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भांडारे, हवालदार विजय अवघडे, हवालदार सचिन नलवडे वाघ तपास करीत आहेत.पथदिवे बंद अवस्थेतमहामार्गावर भुईंजपासून सर्व स्ट्रीट लाईट कित्येक वर्ष पडून बंद आहेत. अनेकवेळा निवेदन देऊन या लाईट सुरू होत नाहीत. त्यामुळे रात्रीच्या अंधारात जखमींना व मदतकार्य करणाऱ्यांना कसरत करावी लागते. याप्रकारे आणखी किती जणांचे बळी गेल्यावर ठेकेदार व जिल्हा प्रशासन या लाईट लावणार हा प्रश्न येथील ग्रामस्थाना पडला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर