शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बाराजणांना सक्तमजुरी

By admin | Updated: April 28, 2015 23:44 IST

मारामारी प्रकरण : काळगाव, डाकेवाडी येथे घडल्या होत्या वेगवेगळ्या घटना

पाटण : डाकेवाडी, काळगाव व साईकडे या गावांमध्ये अनुक्रमे २००९ आणि २०११ मध्ये झालेल्या वेगवेगळ्या तीन मारामारीच्या घटनांमधील बारा आरोपींना पाटण न्यायालयाने सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.याबाबत माहिती अशी की, डाकेवाडी, काळगाव येथे ८ नोव्हेंबर २०११ रोजी यशवंत आण्णा डाकवे यांना शेतात जाणाऱ्या रस्त्यावर गवताच्या मोळ्या का टाकल्या या कारणावरून मारहाण झाली होती. त्यामध्ये ते जखमी झाले होते. याची पाटण न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यानुसार संगीता मस्कर, शिवाजी मस्कर, लक्ष्मण मस्कर, शांताबाई मस्कर यांना दोषी धरून सहा महिन्यांची सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. साईकडे येथे २७ फेब्रुवारी २०११ रोजी दोन गटांत मारामारी झाली होती. या प्रकरणात छगन सकट यांना कुऱ्हाड व दांडक्याने मारहाण केली होती. यामध्ये छगन सकट गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी श्रीरंग सकट, अनिल सकट, अमोल सकट, सतीश सकट, महादेव सकट, श्रीकांत तडाखे यांना एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी अडीच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.तसेच बबन सकट व छगन सकट यांनी भांडणे सोडविण्यास गेलेले श्रीकांत तडाखे यांच्या डोक्यात काठी मारून जखमी केले. त्यामुळे उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून तीन महिन्यांची सक्तमजुरी व एक हजार रुपयांची शिक्षा सुनावण्यात आली. तीन वेगवेगळ्या मारामारीप्रकरणाची सुनावणी पाटण न्यायालयात न्यायाधीश रा. श. भाकरे यांच्यासमोर झाली, अशी माहिती सरकारी वकील संदीप पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. (प्रतिनिधी)