शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
5
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
6
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
7
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
8
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
9
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
10
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
11
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
12
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
13
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
18
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
19
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
20
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवार तळे सुशोभीकरणाची मुहूर्तमेढ!

By admin | Updated: July 4, 2014 00:26 IST

पालिकेत ठराव मंजूर : ‘लोकमत’ वर अभिनंदनाचा वर्षाव; घातक प्रदूषणाच्या प्रश्नावरून सुरू केलेल्या मोहिमेस यश

सातारा : येथील ऐतिहासिक मंगळवार तळ्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ ने केलेल्या उठावाला यश आले आहे. तळ्याच्या सुशोभीकरणासाठी १ कोटी ८५ लाखांच्या खर्चाच्या प्रस्तावाला पालिकेने गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात येणार आहे. तळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यात ‘लोकमत’ने राबविलेल्या जागरण मोहिमेचे नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद अविनाश कदम यांनी भरसभेत जाहीर अभिनंदन केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘लोकमत’ ने गेल्या पंधरा दिवसांपासून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या तळ्यात गणेशमूर्ती विसर्जनामुळे तळ्यातील पाणी प्रदूषित होऊन परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. ‘लोकमत’ने येथील नागरिकांच्या व्यथा वृत्तमालिकेच्या माध्यमातून मांडल्या. दरम्यान, राजघराण्याच्या ताब्यात असणाऱ्या या तळ्यात विसर्जनाला खासदार उदयनराजे भोसले यांनी बंदी घातली. सुशोभीकरणाचा निर्धारही व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने ‘लोकमत’ने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनासाठीही पालिकेला पर्याय सुचविले. शहरातील ऐतिहासिक हौद, शेततळी आणि पोहण्याचा तलाव या साधनांमध्ये शहरातील घरगुती गणेशमूर्तींचे तसेच चार फुटांपर्यंत उंची असणाऱ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करता येणे शक्य आहे. हेही दाखवून दिले. ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची दखल घेऊन पालिकेने मंगळवार तळे सुशोभीकरण करण्याच्या खर्चाला मंजुरी देण्याबाबत कार्यालयाकडून आलेल्या अहवालावर चर्चा करून निर्णय घेणे हा विषय मंजुरीसाठी आला व मंजुरी घेण्यात आली. याबाबत सभेला माहिती देताना नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद अविनाश कदम म्हणाले, ‘लोकमत व कर्तव्य सोशल गु्रप’च्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसारच पालिकेने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा नियोजनच्या निधीतून तळ्याच्या सुशोभीकरणाचा निर्धार केला असून, नोव्हेंबरमध्ये या कामाला सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)