शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

जागोजागी लहानग्यांना गिळू पाहतोय काळ

By admin | Updated: May 1, 2015 00:17 IST

जरा जपून, पुढे धोका आहे... : मुलांना धोक्याची जाणीव करून देणे पालकांची जबाबदारी

प्रदिप यादव - सातारा तालुक्यातील शेंद्रे गावाजवळ टाकीत बुडून दोन मुलांचा करुण अंत झाला तरी धोकादायक टाक्या, चेंबर, डीपी असे अनेक धोके खुलेच ठेवल्याचे दिसून येत आहे. आई-वडिलांचेही मुलांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून मुलांभोवती धोके नव्हे तर धोक्याभोवती मुले घोटाळताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात शेंद्रे येथे परप्रांतीय मजूर कुटुंबातील दोन चिमुरड्यांचा उघड्यावर असणाऱ्या शौचालयाच्या टाकीत पडून अंत झाला. त्याच आठवड्यात मेढा येथेही अशीच दुर्घटना घडली होती. आपल्या घराबाहेर आजूबाजूला अशी काही ठिकाणं असतात की जी लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात. सातारा शहरातही अशी अनेक धोक्याची ठिकाणं आहेत, जिथं लहान मुलं खेळण्याच्या निमित्तानं जातात. आपल्या लहान मुलांवर पालकांनी लक्ष ठेवायलाच हवे. कारण घराबाहेर दडून बसलेला काळ कधी येईल, याचा काही नेम नाही. उन्हाळ्याची शाळेला सुटी लागल्यामुळे आणि घरात उकाडा असल्यामुळे लहान मुलं घराबाहेरच खेळत असतात. अंगणातल्या झाडांवर फळं काढण्यासाठी चढणे, उघड्या टाक्यांशेजारी क्रिकेट खेळणे, आई-बाबांचा डोळा चुकवून पाण्याच्या ठिकाणी जाणे, पाण्यात दगड मारत बसणे असे नानाप्रकारचे खेळ लहान मुले खेळत असतात. अशावेळी घरात बसून न राहता आई-वडिलांनी आपल्या मुलांना सांगितले पाहिजे की, बाळांनो, जरा जपून... पुढे धोका आहे! तसेच कामानिमित्त काढलेल्या पाण्याच्या टाक्यांवर मजबूत झाकण ठेवणेही गरजेचे आहे. भुयारी गटारांचे चेंबर उघडेच!शहरातील सांडपाणी वाहून जावे, यासाठी नगरपालिकेने भुयारी गटारे बांधली आहेत. शहराचा भौगोलिक भाग हा चढ-उताराचा असल्यामुळे भुयारी गटारांची खोली चार ते पाच फूट ठेवण्यात आलेली आहे. ही गटारे साफ करणे, सोयीचे व्हावे, यासाठी ठिकठिकाणी चेंबर काढली आहेत. यामुळे घरातील घाण पाणी बाहेर काढण्याचे काम तर झाले. मात्र, शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटारांची चेंबर्स उघडी असल्याचे पाहावयास मिळते. लहान मुले उत्सुकतेपोटी तिथे जातात आणि आत डोकावून पाहतात. तसेच क्रिकेट खेळताना चेंडू गटारात गेल्यास तो काढण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी दुर्घटना घडू शकते. उघडे चेंबर अपघाताला निमंत्रण देत आहेत.सार्वजनिक शौचालयांच्या टाक्या झाकणाविनाशहरातील अनेक सार्वजनिक शौचालयांच्या टाक्यांना झाकण नाही. या टाक्यांवरील सिमेंटच्या झाकणातील लोखंड चोरण्यासाठी अनेक ठिकाणची झाकणे चोरट्यांनी फोडली आहेत. त्यामुळे अशा उघड्या टाक्या अपघातास कारणीभूत ठरत आहेत. घराजवळ असणाऱ्या अशा टाक्यांभोवती लहान मुले खेळत असतात. टाक्यांभोवती वाढलेल्या गवत, झुडपांमुळे अंदाज न आल्याने दुर्घटना घडू शकते. चेंडू टाकीत पडला तर मुलं धोका पत्करून तो काढण्याचा प्रयत्न करतात.फळं काढताना तोल गेला तर...सध्या आंबा, चिंच, पेरू, चिक्कू या फळांचा हंगाम सुरू झाला आहे. आपल्या घराची शोभा वाढावी, घरच्या झाडांची फळे खायला मिळावी, यासाठी अनेक घरांसमोर आंबा, पेरू, चिकूची झाडे लावलेली दिसतात. फळांनी लगडलेल्या झाडांचे संरक्षण व्हावे, यासाठी कंपाउंड घातलेले असते. ते कधी तारेचे असते किंवा विटांची भिंतही उभारलेली असते. लहान मुले फळे काढण्यासाठी घरातील लोकांचा डोळा चुकवून कंपाउंडवर चढतात. हाताला फळ लागत नसले तर टाचा उंचावून एक फांदी हाताने वाकवून फळे काढण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी तोल जाऊन पडण्याची भीती असते. काही वेळेला घराच्या पत्र्यावर चढून किंवा इमारतीच्या टेरेसवर जाऊन फांद्या ओढून फळे काढण्याचा प्रयत्न होतो. अशा वेळी चुकून तोल गेला तर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. दिवसभर मुलं कुठेतरी खेळतायत असा समज करून पालक घरात निर्धास्त असताना जर एखादा अपघात घडला तर पश्चातापाशिवाय कोणताही पर्याय उरत नाही.लोकवस्तीजवळील उघडे डीपी बॉक्सलोकवस्तीजवळ असणाऱ्या वीजवितरणच्या डीपी बॉक्सला दरवाजा नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. डीपीची झाकणे चोरीला जात असल्यामुळे उघडे डीपी धोकादायक बनले आहेत. जमिनीपासून तीन चार फुटांवर उघड्या अवस्थेत असणाऱ्या डीपीजवळ मुले गेल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. यासाठी पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तसेच डीपी बॉक्स उंच ठिकाणी ठेवून ते कुलूप बंद करणे गरजेचे आहे.