शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

सुनेत्रा शिंदेंचे बंड मागे!

By admin | Updated: April 28, 2015 23:44 IST

शशिकांत शिंदेंची मध्यस्थी : सुरेखा पाटील, कांचन साळुंखेंचा मार्ग मोकळा

सातारा : आमदार शशिकांत शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सुनेत्रा शिंदे यांनी आपले बंड मागे घेतले. तसेच राष्ट्रवादीच्या पॅनेलला जाहीर पाठिंबा देत असल्याचे लेखी पत्रही त्यांनी मंगळवारी आ. शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीच्या सुरेखा पाटील व कांचन शिंदे या दोघींची जिल्हा बँकेत जाण्याची वाट मोकळी झाली आहे.जिल्हा बँक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने कोरेगावच्या सुरेखा पाटील व सातारा तालुक्यातील कांचन साळुंखे या दोघींना महिला राखीव मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघासाठी ३० उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी २७ जणींनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र, राष्ट्रवादीच्या सुनेत्रा शिंदे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला. दरम्यान, मंगळवारी सकाळी आ. शशिकांत शिंदे बँकेत आले होते. तेव्हा सुनेत्रा शिंदे व त्यांचे चिरंजीव सौरभ शिंदे यांनी आमदारांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी पॅनेलच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्याचे त्यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)बाळासाहेब, लालासाहेबांशीही बोलणी यशस्वी : शिंदेसगळे शिंदे आता एकत्र आले आहेत. इथून पुढच्या कालावधीत सर्व सार्वत्रिक निवडणुका सुनेत्रा शिंदे, सौरभ शिंदे व मी स्वत: एकत्रित लढणार आहोत. तसेच येत्या दोन दिवसांत आ. बाळासाहेब पाटील व कोरेगावचे लालासाहेब शिंदे यांची नाराजीही आपण दूर करू, असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.मी खरे तर २४ एप्रिलला वेळ संपल्याने अर्ज मागे घेऊ शकले नव्हते. आमदार शशिकांत शिंदे यांना भेटूनच उमेदवारी मागे घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय मी घेतला होता, त्यानुसार मंगळवारी पाठिंब्याचे पत्र दिले आहे. - सुनेत्रा शिंदे