शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्षपदी सोनवलकर

By admin | Updated: September 22, 2014 00:48 IST

उपाध्यक्षपदी रवी साळुंखे : राष्ट्रवादीत नाराजीनामा; नेत्यांवर सदस्यांची आगपाखड

सातारा : जिल्हा परिषद अध्यक्षपदी फलटण तालुक्यातील कोळकी गटाचे सदस्य माणिकराव सोनवलकर तर उपाध्यक्षपदी कोडोली गटाचे सदस्य प्रदीप ऊर्फ रवी साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली. दोघेही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, सोनवलकर हे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर तर साळुंखे हे खासदार उदयनराजे भोसले समर्थक आहेत. दरम्यान, या निवडीनंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. फलटणहून आलेल्या कार्यकर्त्यांनी गजीनृत्य करत बेल-भंडाऱ्याची उधळण केली. रविवारी (दि. २१) जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत या निवडी झाल्या. दरम्यान, अध्यक्ष निवडीसाठी काँग्रेसकडून महादेव पोकळे, मीनाक्षी पोळ तर उपाध्यक्षपदासाठी अविनाश फाळके यांनी अर्ज दाखल केले होते. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीने डावलले म्हणून नाराज झालेल्या शिवाजीराव शिंदे यांनी अध्यक्षपदासाठी तर अमित कदम यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र, या सर्वांनीच अर्ज मागे घेतल्यामुळे दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)