शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात रिमझिम, जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस जोर धरू लागला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 17:14 IST

Rain Satara: सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रात पुन्हा पाऊस सुरू झाला असून जोर धरू लागला आहे. कोयनेत तर प्रथमच आवक होऊ लागली आहे. तर साताऱ्यात रिमझिम स्वरुपात पाऊस होत असून पूर्वेकडील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण होते.

ठळक मुद्देसाताऱ्यात रिमझिम, जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस जोर धरू लागला ! धरण परिसरात जोरदार; कोयना धरणात प्रथमच आवक सुरू

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रात पुन्हा पाऊस सुरू झाला असून जोर धरू लागला आहे. कोयनेत तर प्रथमच आवक होऊ लागली आहे. तर साताऱ्यात रिमझिम स्वरुपात पाऊस होत असून पूर्वेकडील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण होते.जिल्ह्यात यावर्षी वेळेच्या अगोदर मान्सूनचा पाऊस सुरू झाला. सुरुवातीला काही दिवस पश्चिम भागात चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळपासून पश्चिम भागात पावसाने पुन्हा सुरूवात केली आहे. विशेष करुन धरण क्षेत्रात पाऊस चांगला पडत आहे. यामुळे सध्यस्थितीत तरी कोयना धरणात पाण्याची आवक सुरू झालेली आहे. सकाळच्या सुमारास धरणात ३०७८ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर इतर प्रमुख धरणात अजुन आवक सुरू झालेली नाही.त्याचबरोबर सातारा शहरात मंगळवारी सायंकाळपासून पावसाला सुरूवात झाली. रिमझिम स्वरुपात पाऊस होत आहे. बुधवारीही पाऊस झाला. यामुळे नागरिकांना छत्री, रेनकोट घेऊनच बाहेर पडावे लागत होते.पूर्व भागात काही भागात रिमझिम पाऊस झाला. पण, बहुतांशी भागात दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुष्काळी भागात खरीप हंगाम पेरणीसाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. सध्या पेरण्या रखडल्या आहेत.कोयनेला ५३ मिलीमीटर पाऊस...पश्चिम भागातील धरण परिसरात पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे सर्वाधिक ५३ मिलीमीटर पाऊस झाला. तर आतापर्यंत ऐकूण १९२ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर कण्हेरला ३१ तर ऐकूण ८९ मिलीमीटर पाऊस झाला. धोमला १९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

जूनपासून धोम धरण परिसरात ७२ मिलीमीटर पाऊस झालेला आहे. बलकवडीला बुधवारी सकाळपर्यंत ३६ मिलीमीटर पाऊस झाला. तर आतापर्यंत १०१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्याचबरोबर तारळीला २५ आणि जूनपासून ९५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. खटाव तालुक्यातील येरळा धरण परिसरात अवघ्या ३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर