शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रजनी पवारांच्या मुलावर हल्ला

By admin | Updated: October 16, 2014 00:10 IST

जावळीत ७० टक्के मतदान

सातारा : सातारा-जावळी मतदारसंघात बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान झाले. मतदानाचा टक्का या निवडणुकीत तरी वाढेल, अशी आशा उमेदवारांना होती. मात्र, ती फोल ठरली. सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळेत अवघे 62 टक्के इतके मतदान झाले. सातारा शहरात दुपारी अनेक मतदारसंघांवर शुकशुकाट होता. ऊन खाली झाल्यानंतर पुन्हा मतदानाचा वेग वाढला. एका मतदान केंद्रावर उमेदवाराच्या मुलावर हल्ला झाल्याची घटना घडली.मतदान सुरू असताना काँगे्रसच्या उमेदवार रजनी पवार यांच्या पुत्राला मारहाण झाल्याची घटना मंगळवार पेठेतील एका मतदान केंद्रावर घडली. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, रजनी पवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. सदर बझार येथील मतदान केंद्रावर आले असताना मुलाला मारहाण झाल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ही घटना वगळता इतर ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. दुपारी बाराच्या सुमारास एका उमेदवाराचा मुलगा मंगळवार पेठेतील बूथवर पाहणी करण्यासाठी आला होता. त्यावेळी बूथपासून शंभर मीटरच्या आत असंख्य कार्यकर्ते उभे राहिल्याचे त्याने पाहिले आणि निवडणूक अधिकाऱ्यांना फोनवरून माहिती दिली. त्याच फोनवरून अधिकाऱ्यांनी ड्यूटीवर असलेल्या पोलिसांकडे त्याबाबत विचारणा केली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना मतदानकेंद्रापासून शंभर मीटरच्या रेषेबाहेर उभे राहण्यास सांगितले आणि बाचाबाची झाली. तक्रार करणारा उमेदवाराचा मुलगा आणि त्याच्या साथीदारांना त्यांनी मारहाण केली. संबंधित उमेदवारपुत्र आपल्या गाडीतून निघून जात असताना जमावाने त्याच्या गाडीवरही दगडफेक केली. तथापि, यासंदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आलेली नव्हती. (प्रतिनिधी)व्यापाऱ्यांनी दुपारी केले मतदानसातारा शहरातील राजपथ तसेच कर्मवीर पथावर मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ भरते. सध्या. दिवाळी काही दिवसांवर आली असल्याने या दोन्ही रस्त्यांवर बाजारपेठ फुलली आहे. त्यामुळे व्यवसायाची गैरसोय होऊ नये, म्हणून व्यापारी पेठेतील काही व्यापाऱ्यांनी सकाळच्या टप्प्यात मतदान केले. तर काही व्यापारी व दुकानातील कामगारांनी दुपारी मतदान केले. दुपारच्या वेळेत ग्राहक कमी असतात. त्यामुळे मतदानासाठी कामगारांना काही वेळासाठी सोडले होते. ‘डोळस’ नागरिक : बुधवारी जागतिक अंध सहायता दिन साजरा झाला. ‘डोळे’ नसण्यापेक्षा ‘दृष्टी’ नसणे अधिक वाईट असते, हे विवेकानंदांचे बोल खरे करताना अंध मतदारांनी उत्साहात मतदान करून आपण ‘डोळस’ नागरिक असल्याचे दाखवून दिले. मजुरांनी बजावला हक्क : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या मतदानात भरउन्हात इमारत बांधकामासाठी राबणाऱ्या हातांनीही हिरीरीने सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. डोक्यावर ओझं असलं तरी त्याच्या ताणापेक्षा मतदान केल्याचंच मोठं समाधान या महिलेच्या चेहऱ्यावर दिसत आहे. जावळीत ७० टक्के मतदानमेढा : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या मतदानात मेढा शहरात ६५ टक्के तर जावळी तालुक्यात ६५ ते ७० टक्के मतदान झाल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.मेढा शहरात आठ मतदार केंद्रांवर शांततेत मतदान झाले. सकाळी अकरा वाजेपर्यंत १५ ते २० टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदारांनी गर्दी केली. सकाळी सात वाजता राष्ट्रवादीचे शिवेंद्रराजे भोसले, भाजपाचे दीपक पवार, शिवसेनेचे दगडूदादा सपकाळ यांनी यांनी तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या. मेढा शहरात एकूण ३२०० मतदारांपैकी २०४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जावळीत ७० टक्के मतदानमेढा : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या मतदानात मेढा शहरात ६५ टक्के तर जावळी तालुक्यात ६५ ते ७० टक्के मतदान झाल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.मेढा शहरात आठ मतदार केंद्रांवर शांततेत मतदान झाले. सकाळी अकरा वाजेपर्यंत १५ ते २० टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदारांनी गर्दी केली. सकाळी सात वाजता राष्ट्रवादीचे शिवेंद्रराजे भोसले, भाजपाचे दीपक पवार, शिवसेनेचे दगडूदादा सपकाळ यांनी यांनी तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या. मेढा शहरात एकूण ३२०० मतदारांपैकी २०४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.