शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियमाचे उल्लंघन करणारांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 15:56 IST

corona virus Satara- कोरोना विषाणुवर नियंत्रण ठेवण्यासाठी मलकापूर पालिकेने एक विशेष मोहिम राबवली. शहरात फिरणाऱ्या पालिकेच्या गस्त पथकाकडून मास्क न लावलेल्या ५० ते ६० जणांवर दंडात्मक कारवाई केली. दोन दिवस राबवलेल्या या विशेष मोहिमेत १० हजार दंड वसूल करण्यात आला आहे. या पालिकेच्या दंडात्मक कारवाईचा नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे.

ठळक मुद्देकोरोना नियमाचे उल्लंघन करणारांवर दंडात्मक कारवाई मलकापुरात मोहिम : ५० ते ६० जणांना दंड; १० हजार वसूल

मलकापूर : कोरोना विषाणुवर नियंत्रण ठेवण्यासाठी मलकापूर पालिकेने एक विशेष मोहिम राबवली. शहरात फिरणाऱ्या पालिकेच्या गस्त पथकाकडून मास्क न लावलेल्या ५० ते ६० जणांवर दंडात्मक कारवाई केली. दोन दिवस राबवलेल्या या विशेष मोहिमेत १० हजार दंड वसूल करण्यात आला आहे. या पालिकेच्या दंडात्मक कारवाईचा नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे.मलकापुरात कोरोनावर मात करण्यासाठी पुन्हा विविध उपाय सुरू केले आहेत. शासन, पालिकेचे पदाधिकारी, सर्व कर्मचारी, आरोग्य व पोलिस विभागाने रात्रीचा दिवस करून शहराला कोरोनामुक्त केले होते. यामध्ये सातत्य राखण्यासाठी अनेक उपाय वरचेवर राबवले जात आहेत. मात्र, काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सर्वत्र कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे शहरात गतीने उपाय सुरू केले आहेत.

शहरातील नागरिकांना नियमांची शिस्त लावण्यासाठी शहरात गस्त पथकांची नेमणूक केली आहे. या पथकांनी दोन दिवसात शहरात मास्क न वापरता फिरणाऱ्या ५० ते ६० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत प्रत्येकी १०० ते ५०० रुपयेप्रमाणे १० हजार रुपये दंड वसूल केला. दंडात्मक कारवाईची मोहीम वारंवार राबवावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे. मोहिमेत करनिरिक्षक राजेश काळे, राम गायकवाड, पंकज बागल, सुभाष बागल, सुरेश कराळे, संतोष लोखंडे, वैभव हुलवान यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.नाक-तोंड मोकळेच, मास्क गळ्यात!कोरोनावर मात करण्यासाठी शासन विविध उपाय करत आहे. सामाजिक अंतरासह मास्क लावणे असे अनेक नियम बंधनकारक केले आहेत. मास्क न घालता फिरणाऱ्यांवर पालिकेचे पथक कारवाई करते. मास्क घालणे बंधनकारक असतानाही बहुतांशी नागरिक नाक-तोंड मोकळेच ठेऊन मास्क शोसाठी गळ्यातच अडकवत आहेत.पोलिसांना चकवा देत दुचाकी सुसाटदुचाकीवरून मास्क न घालता फिरण्यास मनाई आदेश आहे. यावर बंधन ठेवण्यासाठी विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस पालिकेच्या मदतीने कारवाई करतात. शहरात अनेक ठिकाणी अशी कारवाई होत असतानाही अनेक दुचाकीस्वार पोलिसांना चकवा देत दोघे-दोघे तर काहीजण तिघे-तिघे विनामास्क बसून सुसाट जातात. त्यामुळे कोरोनाची भितीच नसल्याचे चित्र दिसत आहे.पालिकेतर्फे मास्कचे मोफत वाटपकोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मलकापूर पालिकेने एक विशेष मोहिम राबवली. या मोहिमेत विनामास्क फिरणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी दंड केला जात आहे. त्याचबरोबर पालिकेकडून मोफत मास्कचेही वाटप करण्यात आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरPoliceपोलिसMalkapurमलकापूरMuncipal Corporationनगर पालिका