कारचा टायर फुटल्याचे पाहून सेवारस्त्यावर आपल्या तीन दुचाकी पार्क करून सुरूर येथील युवक कारचालकाला मदत करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान महामार्गावरून आलेली पोलीस गाडी या तीन तरुणांच्या दुचाकीवर आदळल्याने या दुचाकींचे नुकसान झाले असून एक युवक जखमी झाल ...
शेअरबाजारात पैसे गुंतविण्याच्या आमिषाने एका विमा एजंटाची पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात व्यंकटेश विश्राम तानावडे (रा. राजापूर भटाळी, ता. ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, यामध्ये अनेकजणांची फसव ...
पोलिसांची परवानगी न घेता बेकायदा आंदोलन केल्याचा ठपका ठेवून भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
पाचवड येथील नव्याने सुरू झालेल्या टाईल्स व फरशी दुकानामध्ये कामास असलेल्या दोन परप्रांतीय कामगारांमध्ये झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री साडे बारा वाजता ही घटना घडली. ...
सातारा पालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध दर्शवत सोमवारी सर्वधर्मीय सुशिक्षित बेरोजगार हॉकर्स संघटनेच्यावतीने बंद ठेवण्यात आला. या बंदमध्ये पोवई नाका ते भूविकास बँक या परिसरातील तब्बल दोनशे हातगाडीधारकांनी सहभाग घेतला. दरम्यान, पालिक ...
तीन नवीन मोबाईल घेताना ४० हजारांचा धनादेश दिला. मात्र, तो न वटल्याने मोबाईल मालकाची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विश्रूत नवाथे (रा. शनिवार पेठ, सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
आजी सतत अभ्यास कर, असे म्हणते म्हणून सहावीतील एका मुलाने साताऱ्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. सातारा बसस्थानक प्रमुख व पोलिसांनी त्याचे समुपदेशन केले. त्यानंतर त्याला नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. संबंधित मुलाने यापूर्वीही आपल्या आईला आत्महत ...
विजय दिवस समारोहाच्या पार्श्वभूमीवर समिती आणि पालिकेच्यावतीने रविवारी सकाळी प्लास्टिकमुक्त कऱ्हाड दौड काढण्यात आली. त्यामध्ये समिती, पालिकेचे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, शहर व परिसरातील शाळांतील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदव ...