शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे लोकांची हत्या दुसरीकडे अनाथांना दत्तक !

By admin | Updated: August 20, 2016 22:50 IST

आणखी एक नाटक : काळी प्रतिमा बदलण्यासाठी संतोषचा नवा सोशल फंडा; आश्रमाकडून नकार

दत्ता यादव --सातारा -एकापाठोपाठ एक खून करून रक्ताने डागाळलेल्या हातावरील कलंक कायमचे पुसायचे असतील तर समाजात प्रतिष्ठा मिळवायलाच हवी. हे चांगले ठाऊक असलेल्या संतोष पोळचे आता अनेक किस्से समोर येत आहेत. स्वत:ची काळी प्रतीमा पुसण्यासाठी अनाथ मुले दत्तक घेऊन समाजात त्याला सहानुभूतीचे स्थान निर्माण करायचे होते. अनाथ मुले दत्तक घेण्याची प्रक्रिया कशी असते, याची माहिती घेण्यासाठी त्याने पुणे आणि सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात खेटे मारल्याचे समोर येत आहे.संतोषने थंड डोक्याने सहाजणांना यमसदनी धाडले. त्यामुळे त्याचा पूर्व इतिहास कसा होता, त्याच्या संपर्कात कोण-कोण होते. त्याला भविष्यात काय करायचे होते, असे अनेक औत्सुक्याचे विषय सध्या चर्चेला जात आहेत. त्यातूनच संतोष पोळच्या विकृतीचा खजिना जगासमोर येत आहे. मात्र आपण ज्यांना दुखावले आहे. त्या लोकांकडून एक ना एक दिवस आपली काळी कृत्ये उघड होतील, याचीही त्याला सातत्याने भीती वाटत होती. त्यामुळे आत्तापर्यंत जे झालं ते झालं, असं समजून पोळने समाजात सहानुभूती मिळविण्यासाठी ‘अनाथांचा आसरा’ घेण्याचा निर्णय घेतला होता. या मुलांचा सांभाळ केल्यानंतर साहजिकच लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनही बदलेल, या विचाराने त्याने अनाथ मुले दत्तक घेण्यासाठी जी काय प्रक्रिया आहे. त्याची माहिती घेण्यास सुरुवात केली. जिल्ह्यातील एका अनाथ आश्रमामध्ये जाऊन त्याने मुले दत्तक घ्यायची इच्छाही व्यक्त केली होती. मात्र अनाथ आश्रममधील मुले सहजासहजी दत्तक देता येत नाहीत, याची प्रक्रिया प्रचंड किचकट आहे, असे त्याला सांगण्यात आले. त्यामुळे त्याने पुण्यात जाऊनही माहिती घेतली होती.