शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2020 : मी- दुर्गा : अर्चना अहिरेकर यांनी गावापासून कोरोनाला दूर ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 17:53 IST

coronavirus, navratri, health, sataranews कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करणे कधी-कधी अवघड ठरते; पण याच संकट काळात फलटण तालुक्यातील उळुंब येथील अंगणवाडी सेविका अर्चना अहिरेकर यांनी आशा स्वयंसेविका, आरोग्य विभाग आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून गाव अजूनही कोरोनापासून दूर ठेवले आहे. यामध्ये अहिरेकर यांचे योगदान मोलाचे आहे.

ठळक मुद्देNavratri 2020 : मी- दुर्गा : अर्चना अहिरेकर अहिरेकर यांनी गावापासून कोरोनाला दूर ठेवले

नितीन काळेलकोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करणे कधी-कधी अवघड ठरते; पण याच संकट काळात फलटण तालुक्यातील उळुंब येथील अंगणवाडी सेविका अर्चना अहिरेकर यांनी आशा स्वयंसेविका, आरोग्य विभाग आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून गाव अजूनही कोरोनापासून दूर ठेवले आहे. यामध्ये अहिरेकर यांचे योगदान मोलाचे आहे.जिल्ह्यात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे प्रशासनावर मोठी जबाबदारी आहे. यामध्ये आरोग्य विभागाबरोबरच अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान ठरत आहे. याला कारण म्हणजे सेविकांना सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण याबाबतीत उळुंब येथील अंगणवाडी सेविका व महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या जिल्हाध्यक्षा अर्चना अहिरेकर सुदैवी ठरल्या. कारण, त्यांना ग्रामस्थांचे सहकार्य नेहमीच मिळत आले आहे. तसेच कुटुंबही पाठीशी राहिले.फलटण तालुक्यातील उळुंबची लोकसंख्या १०५२ आहे. या गावात अजूनही कोरोनाने शिरकाव केलेला नाही. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात तर गावात मुंबईतून ९५ लोक आले होते. या लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे त्यांनीही नियमांचे पालन केले.

विशेष म्हणजे अर्चना अहिरेकर यांनी होम क्वारंटाईन झालेल्या काही लोकांना बाजार, भाजीपाला आणि दूध घरी पोहोच केले. अडचणी जाणून घेतल्या; पण गावात कोरोना विषाणू येऊ द्यायचा नाही, यासाठी त्या कार्यरत राहिल्या.आजही त्या घरोघरी भेट देऊन माहिती घेत असतात.

कोणाला सर्दी, ताप, खोकला आहे का? याची नोंद घेऊन संबंधितांना माहिती दिली जाते. याच कोरोना काळात गावात आरोग्य शिबिर झाले. त्यामधून काही लोकांना मधुमेह, रक्तदाब दिसून आला. सॅनिटायझरचा वापर, मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर याबाबत लोकांमध्ये जनाजागृती करण्यात अर्चना अहिरकेर यशस्वी ठरल्यात. ग्रामस्थांचेही सहकार्य मिळत आहे. त्यामुळे उळुंब अजूनही कोरोना विषाणूपासून दूर आहे.

गावातील लोक सुशिक्षित आहेत. आवश्यक तेवढ्या कामासाठीच ग्रामस्थ गावाबाहेर पडत आहेत. तर बाहेरच्या गावांतील लोकांना प्रवेश बंद केला होता. त्यामुळे उळुंब गावात कोरोनाचा शिरकाव झाला नाही. यापुढेही गावात कोरोना येऊ द्यायचा नाही. ग्रामस्थांचा हा निर्धार अजूनही कायम आहे.- अर्चना अहिरेकर,अंगणवाडी सेविका(८८३०२११५७७)

टॅग्स :Navratriनवरात्रीcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यSatara areaसातारा परिसर