शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘मन की बात’ची दखल प्रेरणा देणारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:26 IST

सातारा : ‘एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या भारतात पंतप्रधानांच्या तोंडी आपलं नाव येणं हा खूप मोठा सन्मान आहे. ‘मन की ...

सातारा : ‘एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या भारतात पंतप्रधानांच्या तोंडी आपलं नाव येणं हा खूप मोठा सन्मान आहे. ‘मन की बात’मध्ये त्यांनी केलेला माझा उल्लेख टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पदकाचे लक्ष्य साधण्यासाठी निश्चित प्रेरणा देणारा आहे,’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया नेमबाज प्रवीण जाधव याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील सरडे या गावचा प्रवीण जाधव विश्वचषक स्पर्धांसाठी सध्या पॅरिसमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये प्रवीणचा उल्लेख केला. यावर प्रवीण म्हणाला, ‘ऑलिम्पिक स्पर्धेत निवड झाल्यानंतर जळीस्थळी नेमबाजीच दिसत होती. कुठं बाहेर गेलो तरीही लक्ष्य टोकियो ऑलिम्पिक पदकाचे होते. कोरोनाचे संकट घोंघावू लागलं तेव्हा सरावाला आणि तयारीला अजून एक वर्ष बोनस मिळालं असं ठरवलं आणि तयारीला लागलो. कोरोनाच्या परिस्थितीत सर्व खबरदारी घेऊन मी सज्ज आहे. जागतिक स्पर्धेसाठी पॅरिसमध्ये असताना आई-वडिलांचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझं नाव घेतलं. एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील सर्वाेच्च पदावरील व्यक्तीने आपल्या नावाचा उल्लेख करणं हा क्षण माझ्यासाठी अभूतपूर्व असाच आहे. माझ्या आई-वडिलांनी शेजाऱ्यांकडून व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल करून आपलं नाव घेतलं, असं सांगताना त्यांना रडूच कोसळले. त्यांच्या कष्टप्रद आयुष्याला माझ्या छोट्याशा प्रयत्नांनी दिलेली ही सलामी असल्याचे मी मानतो.’

दरम्यान, सरडे येथे पाच फूट रूंद आणि पंधरा फूट लांब झोपडीत राहणाऱ्या प्रवीणचे वडील रमेश आणि आई संगीता हे दोघेही लोकांच्या शेतात मजुरी करतात. प्रवीणच्या या वाटचालीत त्याचे प्राथमिक शिक्षक विकास भुजबळ यांच्या मार्गदर्शनाचा वाटा मोठा आहे.

चौकट :

वर्ल्ड कप गमावलं... ऑलिम्पिकचं लक्ष्य!

पॅरिस येथे सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत त्याने धडक मारली. अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यात आलेलं अपयश हे ऑलिम्पिकच्या यशाकडे जाणारी पहिली पायरी असल्याचं प्रवीण मानतो. पॅरिसमध्येही ऑलिम्पिकचा सराव सुरू आहे. सोमवारी तो भारतात येणार असून त्यानंतर टोकियोला जाणार आहे.

फोटो

२७प्रवीण जाधव