शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘कारटेप’चा आवाज वाढवून रस्त्यावर तरुणाईचा ‘एन्जॉय’

By admin | Updated: May 25, 2016 23:39 IST

सदर बझार परिसर : रात्री उशिरापर्यंत रंगतायत युवकांच्या गप्पा

प्रदीप यादव --सातारा -वेळ : रात्री साडेबाराची. स्थळ : सदर बझार पोलिस चौकी परिसर. ‘लोकमत टीम’ सातारा शहरातील रात्रीच्या घडामोडी टिपण्यासाठी रस्त्यावरून फिरत असतानाच वाऱ्याच्या झुळूकेबरोबर कानावर गाण्यांचा आवाज पडला. आवाजाच्या दिशेने गेलो असता सदर बझार पोलिस चौकीसमोर एका चारचाकीमध्ये साऊंडसिस्टिम सुरू करून काही युवक मोठ्या आवाज गाणी ऐकत बसलेले दिसले. दिवसभर काम थकलेले काही मित्र एकत्र कट्ट्यावर बसून संगीताचा आनंद घेत होते. मनस्वी जगत नाही, ती तरुणाई कसली, याचेच दृश्य याठिकाणी पाहायला मिळाले. सगळं शहर झोपी गेलं असताना काही युवक चारचाकीची दारं उघडी ठेवून संगीत ऐकत मोबाईलवरील अ‍ॅप्स एकमेकांना शेअर करत होते. हे दृश्य कॅमेऱ्यात टिपून ‘लोकमत टीम’ जिल्हा परिषद चौकात पोहोचली. येथे कुत्र्यांची गुरगूर शांतता भंग करत होती. उकाड्यामुळे या चौकातही एक वयस्क जोडपे शतपावली करताना दिसले. थंड हवेत गप्पा मारत ते आजी-आजोबा रस्त्याने फिरत होते.गुरुवार परज परिसरात सव्वा एक वाजता पोहोचलो. शॉपिंग हॉलच्या समोर कष्टावलेली शरीरं विश्रांती घेत होती. प्रत्येक दुकानासमोर काही लोक झोपले होते. जणू काही ते दुकानांची रखवालदारीच करत असावेत, असे ते चित्र होते. कर्मवीर पथावर मध्यरात्री ‘काऊ वॉक’दिवस असो किंवा रात्र सातारच्या रस्त्यावर नेहमी भटक्या जनावरांचा वावर असल्याचे पाहायला मिळते. मात्र, यंदा उन्हाचे चटके जरा जास्त बसू लागल्याने दिवसभर मोकाट जनावरे झाडांच्या आडोशाला किंवा इमारतीच्या सावलीला रवंथ करत बसलेली असतात. त्यामुळे सातारच्या रस्त्यांवर दिवसभर केवळ वाहनांची वर्दळ दिसते. सूर्य मावळतीला गेला की मग बैठक मारुन बसलेली जनावरे मोकाट फिरायला सज्ज होतात आणि रात्रभर इकडून तिकडे चाऱ्यासाठी भटकत असतात. ‘लोकमत टीम’ रात्रीचा सातारा आपल्या कॅमेऱ्यात टिपत असतानाच कर्मवीर पथावर दहा-बारा गायी एका पाठोपाठ चालत निघाल्याचे दिसले. कर्मवीर पथावरील हे ‘काऊवॉक’ शिस्तीचे दर्शन घडवत होते. मात्र याच रस्त्यावरून दिवसा व रात्रीही वाहनधारक बेशिस्तीचे दर्शन घडवत असताना अनेकांनी पाहिले आहे. कचराकुंड्यामध्ये घास शोधण्यासाठी रात्री-बेरात्री या जनावरांची धडपड सुरू होती.