शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेंद्रेत ग्रामविकास पॅनेलविरुद्ध अजिंक्य पॅनेलमध्ये अटीतटीची लढत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST

शेंद्रे : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान गावा-गावात सुरू आहे. सातारा तालुक्यातील शेंद्रे जिल्हा परिषद गटातील राजकीयदृष्या संवेदनशील असलेल्या शेंद्रे ...

शेंद्रे : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान गावा-गावात सुरू आहे. सातारा तालुक्यातील शेंद्रे जिल्हा परिषद गटातील राजकीयदृष्या संवेदनशील असलेल्या शेंद्रे ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास पॅनेल विरुद्ध अजिंक्य पॅनेल यांच्यामध्ये ‘कांटे की टक्कर’ रंगली आहे. १३ सदस्य असलेल्या शेंद्रे ग्रामपंचायतीत २६ अर्ज शिल्लक राहिल्याने दोन्ही पॅनेलमध्ये सरळ लढत होत आहे. यामध्ये कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

शेंद्रे हे जिल्हा परिषद गटातील सर्वात जास्त मतदान असलेले गाव असल्याने या निवडणुकीवर संपूर्ण जिल्हा परिषद शेंद्रे गटाचे लक्ष असते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेंद्रे गावातील वातावरण ढवळून निघाले आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. ग्रामविकास पॅनेलमार्फत प्रभाग क्रमांक एकमधून दीपाली संजय माने, बापूसाहेब रामचंद्र पोतेकर, कोमल विशाल विभुते. वाॅर्ड दोनमध्ये सारिका संभाजी बर्गे, पाकीजा यासीन मुलाणी, मारुती रामचंद्र पडवळ, वाॅर्ड तीनमध्ये सुरेखा सुरेश घोलप, विजय रामचंद्र जाधव, वाॅर्ड चारमध्ये भानुदास विष्णू विभुते, निर्मला विजय पोतेकर, विष्णू ज्योती जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तसेच अशोकराव मोरे विचार मंचचे अजिंक्य पॅनेलमधून वाॅर्ड एकमध्ये मनीषा दत्तात्रय क्षीरसागर, सागर बाळकृष्ण पोतेकर, स्वाती स्वप्निल पडवळ, वाॅर्ड दोनमध्ये नंदिनी किशोर भोसले, सुरेखा राजेंद्रकुमार दीक्षित, हणमंत श्रीरंग पडवळ, वाॅर्ड तीनमध्ये पूनम सोमनाथ जाधव, श्रीरंग लक्ष्मण वाघमारे, वाॅर्ड चारमधून रेखा सुनील पडवळ, आस्लम हुसेन मुलाणी, सोपान शिवाजी भोसले या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.

चौकट :

वॉर्ड चारच्या निकालावर सत्तेचे गणित

शेंद्रे ग्रामपंचायत निवडणुकीत तीन सदस्य असलेल्या वॉर्ड चारवर ज्या गटाचे वर्चस्व राहणार, त्या गटाच्या ताब्यात ग्रामपंचायतीची सत्ता जाणार, याची दाट शक्यता आहे. या वॉर्डात अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कामगार वसाहतीचे मतदान जास्त आहे.

चौकट :

दोन्ही राजेंची भूमिका तटस्थ

या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले या दोघांचे कार्यकर्ते दोन्ही पॅनेलमध्ये विभागले असल्याने दोन्ही राजे या निवडणुकीत कोणत्याही गटाला ताकद न देता तटस्थ राहण्याची भूमिका घेणार असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीत कोणताही गट विजयी झाला तरी दोन्हीही गट आमदार व खासदार यांचेच नेतृत्व मानणारे आहेत.