शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

संवर्धनात्मकतेवर भर देणारी अनुभूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 04:38 IST

महाराष्ट्र पक्षीमित्र संयोजित दुसरे अखिल भारतीय व ३२वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन क-हाड येथे २३ व २४ नोव्हेंबरला उत्साहात पार पडले.

- संजय करकरे ।महाराष्ट्र पक्षीमित्र संयोजित दुसरे अखिल भारतीय व ३२वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन क-हाड येथे २३ व २४ नोव्हेंबरला उत्साहात पार पडले. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या पक्षीप्रेमींची ही मांदियाळी येथून खूप काही माहितीचा संग्रह करून आपापल्या प्रांतात परत गेली. केवळ संशोधनात्मक अनुभव सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती संवर्धनात्मकेवर अधिक भर देण्याची एक अनुभूती या संमेलनात जाणवली, ही पक्षीप्रेमींबरोबरच निसर्गप्रेमींसाठी मोठी अभिमानाची बाब म्हणता येईल.कोणतेही संमेलन, मेळावा म्हटला की, मोठी तयारी, थाटमाट, संयोजन हे आलेच. हे तर राज्यभरातील पक्षीप्रेमींना एकत्र करणारे, विचारांचे, अनुभवांचे आदानप्रदान करणारे संमेलन होते. काही अपवाद वगळता सतत ३२ वर्षे हे संमेलन आयोजित होत आहे. १९८२ साली सुरू झालेला हा यज्ञ आजही मोठ्या तेजाने सुरू आहे. ज्येष्ठ पक्षी अभ्यासकांची फौज आता थकली आहे. त्यामुळे हा सर्व पसारा नव्या दमाच्या पक्षीप्रेमींकडे आला असल्याचे लक्षात येत आहे. कºहाड येथील संमेलनात याचे प्रतिबिंब पाहायला मिळाले. किशोर रिठेंसारख्या नव्या दमाच्या, दीर्घ अनुभवाच्या वन्यजीव अभ्यासकाकडे संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा गेल्यावर तर ते अधिक ठळकपणाने जाणवले. रिठे यांनी पक्षी संवर्धनातील नेमक्या बाबींवर बोट ठेवले. केवळ ढीगभर पक्षी संवर्धनाचे अहवाल प्रसिद्ध करण्यापेक्षा ते अधिक लोकाभिमुख होण्याची गरज त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. संशोधन निबंधामुळे पक्षी प्रजाती वाचतील अथवा त्यांचे संवर्धन होईल, या भ्रमात न राहण्याचा सल्लाही त्यांनी आपल्या भाषणात दिला.पक्षीशास्त्र आता अत्यंत प्रगत होत चालले आहे. केवळ पारंपरिक पक्षीनिरीक्षणापुरते न राहता, ते आता मोबाइल अ‍ॅप, इबर्ड, कॉमन बर्डपासून विविध मॉनिटरिंगपर्यंत विस्तारत चालले आहे. पक्ष्यांना कडी लावणे आता मागे पडून ‘पीटीटी’पर्यंत विस्तारत आहे. शास्त्रीय निरीक्षणांच्या या जोडीलाच संवर्धन, सिटिझन, सायन्सची भक्कम बाजू मिळत आहे. त्यामुळे येणाºया काळात त्याचे महत्त्व अधिक वाढत जाणार आहे.देशात केवळ महाराष्टÑात दरवर्षी नियमितपणे पक्ष्यांची अशी संमेलने भरत आहेत. त्याहून पुढे जाऊन त्यात प्रादेशिक संमेलनांची भर पडत आहे. भाऊ काटदरे, डॉ. जयंत वडतकर, डॉ. राजू कसंबेंसह अनेक जणांचा चमू या प्रादेशिक संमेलनाच्या बाजूने उभा राहत असून, त्या संमेलनांची उंची गाठण्यासाठी प्रयत्नशील आहे. कराड जिमखान्याचे पदाधिकारी सुधीर एकांडे, नाना खामकर, हेमंत केंगळे, रोहन भाटे, पापा पाटील यांच्यासह अनेकांचे संमेलनाच्या उत्तम आयोजनासाठी सहकार्य लाभले.वर्धा येथील ज्येष्ठ पक्षी अभ्यासक प्रा. किशोर वानखडे व दिलीप वरखडे यांनी वर्धा ते कºहाडदरम्यान सायकल रॅली काढून एक नवा पायंडा पाडला. पक्षीमित्रांनी सायकलने भटकंती करून पक्ष्यांच्या अधिवास प्रदूषणमुक्त करावा, यासाठी त्यांनी ही सायकलयात्रा काढली होती.गेल्या काही दिवसांपूर्वी पांढरकवड्यात झालेल्या टी १ या वाघिणीच्या मृत्यूबद्दल या संमेलनात विचार मांडले गेले, ते वनखात्याचे धडाडीचे अधिकारी सुनील लिमये यांच्याकडून. लिमये उद्घाटन सत्रासोबतच दुसºया दिवशीही संमेलनात उपस्थित राहिले. त्यांनी या वेळी खास त्यांच्या शैलीत मनमोकळेपणे या वाघिणीबद्दलची वनविभागाची भूमिका स्पष्ट मांडली. केवळ वाघच नाही, तर माळढोक पक्ष्याबद्दल वनविभागाने काय केले, हेही त्यांनी सांगितले.(सहायक संचालक, बीएनएचएस, नागपूर.)