शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याची डील रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसावर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 12:49 IST

Crimenews Police Satara- सोन्याचा बेकायदा व्यवहार रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर आरोपींनी जीवघेणा हल्ला केला. लोखंडी रॉडसह लाकडी दांडक्याने आरोपींनी पोलिसाला मारहाण केली. या मारहाणीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देसोन्याची डील रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसावर जीवघेणा हल्लापेरले येथील घटना : पोलीस गंभीर जखमी; आठजण ताब्यात

उंब्रज : सोन्याचा बेकायदा व्यवहार रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर आरोपींनी जीवघेणा हल्ला केला. लोखंडी रॉडसह लाकडी दांडक्याने आरोपींनी पोलिसाला मारहाण केली. या मारहाणीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पेरले, ता. कराड गावच्या हद्दीत शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी उंब्रज पोलिसांनी शनिवारी पहाटे आठजणांना ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटण पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल मुकेश संभाजी मोरे हे शुक्रवारी रात्री त्यांच्या खासगी वाहनाने शासकीय कामानिमित्त सातारला निघाले होते. त्यावेळी पेरले गावच्या हद्दीत सोन्याची डिल होणार असल्याची माहिती त्यांना मिळाली.

या माहितीनुसार कॉन्स्टेबल मोरे संबंधित ठिकाणी पोहोचले. त्याठिकाणी चार संशयित त्यांना दिसले. कॉन्स्टेबल मोरे यांनी त्या चौघांना हटकले असता संशयितांनी शिवीगाळ दमदाटी करून लाकडी दांडके व लोखंडी रॉडने कॉन्स्टेबल मोरे यांना बेदम मारहाण केली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी जखमी कॉन्स्टेबल मोरे यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. शनिवारी पहाटे कोम्बिंग ऑपरेशन राबवून आठ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे घटनेविषयी सखोल चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस