शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विषारी अन् घातक धुराची अफवा अन् सातारकरांनी घेतला धसका, तिसऱ्या दिवशीही आग विझविण्याचे प्रयत्न सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:57 IST

तिसऱ्या दिवशीही पालिकेचा डेपो धुमसलेलाच 

सातारा : सातारा पालिकेच्या सोनगाव येथील कचरा डेपोत सोमवारी लागलेली आग तिसऱ्या दिवशीही धुमसत होती. ही आग विझविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून वाई, कराड, रहिमतपूर व महाबळेश्वर या पालिकांचीही मदत घ्यावी लागली; परंतु आग आटोक्यात आली नाही.

दरम्यान, धुरामुळे गंभीर स्वरूपाचे आजार होत असल्याची अफवा पसरल्याने कचरा डेपो व अजिंक्यतारा परिसरातील नागरिकांनी भलतीच धास्ती घेतली. काही नागरिकांनी तर खबरदारीचा उपाय म्हणून गावी जाण्याचे नियोजनही केले.

सोनगाव येथील कचरा डेपोत सोमवारी (दि. ९) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग वणव्यामुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाच आहे. या आगीमुळे कचऱ्याने पेट घेतल्याने डेपोत गेल्या तीन दिवसांपासून अक्षरश: आगडोंब उसळला आहे. सातारा पालिकेच्या अग्निशमन व आराेग्य विभागाची यंत्रणा ही आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याचे ती विझविण्याचे नाव घेईना. 

बुधवारी (दि. ११) रात्री आठ वाजेपर्यंत केवळ ३० ते ३५ टक्के आग आटोक्यात आली होती. यासाठी पालिका प्रशासनाला अन्य पालिकांची मदतही घ्यावी लागली. दरम्यान, कचरा डेपोतून निघणारा धूर हा अत्यंत विषारी अन् घातक असल्याची अफवा अज्ञातांकडून पसरविण्यात आली आहे. त्यामुळे डेपो परिसरातील वाड्या-वस्त्या तसेच अजिंक्यतारा पायथा परिसरातील नागरिकांनी या अफवेचा एकच धसका घेतला आहे.

टँकरच्या १०० हून अधिक फेऱ्या...

५० तासांहून अधिक काळ धुमसत असलेली ही आग विझविण्यासाठी एकूण १४ वाहनांच्या तीन दिवसांत १०० हून अधिक फेऱ्या झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. आग नियंत्रणात आणण्यासाठी जलदगतीने पाणी मिळाले, या कामात खंड पडू नये यासाठी पालिकेकडून डेपोजवळ नवीन लाईन टाकण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Garbage Depot Fire: Smoke Rumors Cause Panic, Efforts Continue

Web Summary : A fire at Satara's Songaon garbage depot, burning for three days, sparked panic due to rumors of toxic smoke. Firefighters from multiple municipalities are working to extinguish the blaze, which is only partially contained. Over 100 tanker trips have been made to combat the fire.