शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कारागृहात धारदार कटर टाकला, अज्ञातावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 10:51 IST

सातारा येथील जिल्हा कारागृहात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञाताने चायनीज चिकन राईस, धारदार कटर आणि चिठ्ठी टाकली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, चिठ्ठीत बाबा, १३/१२ ला काम झाले पाहिजे,असा मजकूर लिहिलेला आहे, असे सांगण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा कारागृहात धारदार कटर टाकला, अज्ञातावर गुन्हाचिठ्ठीत १३/१२ ला काम झाले पाहिजे असा मजकूर

सातारा : येथील जिल्हा कारागृहात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञाताने चायनीज चिकन राईस, धारदार कटर आणि चिठ्ठी टाकली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, चिठ्ठीत बाबा, १३/१२ ला काम झाले पाहिजे,असा मजकूर लिहिलेला आहे, असे सांगण्यात आले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहर पोलीस ठाण्याजवळच जिल्हा कारागृह आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कारागृहातील सर्कल नंबर २ च्या पाठीमागे असलेल्या कैद्याच्या अंघोळी शेडच्या पत्र्यावर कोणीतरी काहीतरी टाकल्याचा आवाज आला. त्यामुळे तेथील पोलीस कशाचा आवाज आला आहे? ते पाहण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना त्याठिकाणी खाकी रंगाच्या कागदात काहीतरी गुंडाळल्याचे दिसून आले. त्यानंतर आत पाहिले असता प्लास्टिकच्या कागदात चायनीज चिकन राईस, एक पांढऱ्या रंगाचा धारदार कटर आणि एक चिठ्ठी मिळून आली.कारागृहात आढळलेल्या या चिठ्ठीत बाबा, १३/१२ ला काम झाले पाहिजे, असा मजकूर होता. तसेच या मजकुराच्या डाव्या बाजूस वर्तुळात टीजी ही अक्षरे होती. तर कारागृहात हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधितांनी कारागृह अधीक्षकांना याची माहिती दिली. त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात हवालदार दौलत खिलारे यांनी अज्ञाताच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :jailतुरुंगSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी