शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात आपत्ती व्यवस्थापन सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : तालुक्याला दरवर्षी पुराचा फटका बसतो. कृष्णा, कोयना नद्यांना पूर आल्यानंतर शहरात पाणी शिरते. सध्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कऱ्हाड : तालुक्याला दरवर्षी पुराचा फटका बसतो. कृष्णा, कोयना नद्यांना पूर आल्यानंतर शहरात पाणी शिरते. सध्या पावसाळा सुरू झाल्याने पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात असून, आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला आहे. या विभागाकडून मंगळवारी कृष्णा व कोयना नदीकाठची पाहणी करण्यात आली. तसेच आपत्तीकाळात वापरण्यात येत असलेल्या बोटींची चाचणीही घेण्यात आली.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशानुसार, मंगळवारी दुपारी नायब तहसीलदार आनंदराव देवकर, मंडलाधिकारी महेश पाटील, तलाठी संजय जंगम, अग्निशामक दलाचे माने, विनोद काटरे, महसूल विभागातील कर्मचारी यांनी कृष्ण व कोयना नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन विभागातील साहित्य व बोटींची तपासणी केली. तसेच बोटीतून नदीकाठची पाहणीही केली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कऱ्हाडला आवश्यक साहित्य देण्यात आलेली आहेत.

प्रांताधिकारी उत्तम दिघे व तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या सूचनेनुसार, तालुका आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने नदीपात्रांची पाहणी करण्यात आली. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा कराड शहरात पुराचे पाणी शिरू न देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग व प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेत जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बचाव दलाची टीम कऱ्हाडला दाखल होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

फोटो : १६केआरडी०४

कॅप्शन : कऱ्हाड येथे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून बोटींची चाचणी घेण्यात आली.