शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST

कोयनानगर : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला अद्याप सूर गवसला नसून तुरळक सरी वगळता पावसाची उघडीप दिली आहे. १ ...

कोयनानगर : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला अद्याप सूर गवसला नसून तुरळक सरी वगळता पावसाची उघडीप दिली आहे. १ जूनपासून सुरू झालेल्या नवीन तांत्रिक वर्षातील पंधरा दिवसांत केवळ २.०६४३ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. तर सिंचन व वीजनिर्मिती बाष्पीभवनाने २.८५ टीएमसी पाणी खर्ची झाले आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात काहीशी घट झाली आहे.

कोयना धरणात सध्या ३,७५२ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. पश्चिमेला वीजनिर्मितीस २.२७ टीएमसी, पूर्वेला सिंचनसाठी ०.४०७ टीएमसी व बाष्पीभवन, गळती यामुळे २.८५ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे, तर धरणाच्या पाणीसाठ्यात ०.७८ टीएमसीने घट झाली आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत पावसाचा जोर कमी आहे. गेल्या वर्षी १५ जून रोजी पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमापकावर पावसाची नोंद कोयनानगर येथे ३३५, नवजा येथे ३१९ तर महाबळेश्वरला ४३९ मिलिमीटर इतकी होती. या वर्षी मात्र कोयना येथे १३९, नवजा येथे २१० तर महाबळेश्वर येथे ३२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता २८.४९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तो गेल्या वर्षी ३२.२७ टीएमसी होता. सातारा, सांगली जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सिंचनासाठीचा पायथा वीजगृहातून सोडण्यात येणारे पाणीही ५ जूनपासून बंद करण्यात आले आहे. चोवीस तासांत कोयना येथे १३, नवजा ३ तर महाबळेश्वर येथे १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.