शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

Satara: किणीप्रमाणेच आनेवाडी टोलनाक्यावर सवलत द्या, काँग्रेसची आक्रमक मागणी 

By नितीन काळेल | Updated: August 7, 2024 19:43 IST

आठ दिवसांत निर्णय घेण्याबाबत इशारा 

सातारा : कोल्हापूर जिल्ह्यातील किणीप्रमाणेच आनेवाडी टोल नाक्यावरही सवलत द्यावी. २० किलाेमीटर परिघरातील गावांना १०० टक्के टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय काॅंग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच याबाबत आठ दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही काॅंग्रेसकडून देण्यात आलेला आहे.याबाबत काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई, अॅड. दत्तात्रय धनावडे, अन्वर पाशा खान, मनोज तपासे आदींच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या प्रकल्प व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कोल्हापूर ते पुणे दरम्यान महामार्गाची दुरवस्था झाली आहे. याचा त्रास प्रवाशी तसेच वाहनधारकांना होत आहे. यामुळे कोल्हापूर ते पुणे हद्दीतील सर्व टोलनाक्यावर महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनधरकांकडून टोल वसूल करण्यात येऊ नये यासाठी काँग्रेसच्यावतीने शनिवार टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले हाेते. त्यावेळी आनेवाडी टोल नाक्यावरही आंदोलन झाले होते. या आंदोलनादम्यान सहायक व्यवस्थापक जोशी यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते.

आंदोलनादरम्यान प्रकल्प व्यवस्थापकांनी लेखी पत्र दिले. मात्र, आपल्याच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या कोल्हापूर कार्यालयाने यासंदर्भात किणी (कोल्हापूर) टोलनाका आणि तासवडे (कऱ्हाड) या दोन्ही टोलाक्याबाबत २५ टक्के सरसकट वाहनांना टोल सवलत तर २० किलोमीटर परिघामधील गावांना १०० टक्के टोल माफीची सुट दिल्याचे नमूद केले आहे. यावरुन आनेवाडी आणि पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोलनाक्याविषयी दिलेले पत्र हे केवळ आमच्या समाधानासाठी आणि वेळ मारून नेण्यासाठी दिले असल्याचे स्पष्ट होत आहे. याचा विचार करावा, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आलेले आहे.

..तर ठिकाणी एकाचवेळी आंदोलन होणार कोल्हापूर येथील विभागाने दिलेली सवलत आणि सूट आनेवाडी टोलनाक्यावर देण्यात यावी. याबाबतचा निर्णय येत्या आठ दिवसांत घ्यावा. तसेच न झाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. हे आंदोलन एकाचवेळी आणि एकाच दिवशी पुणे, सातारा आणि कऱ्हाड येथे केले जाईल, असा इशाराही काॅंग्रेसच्या वतीने देण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtollplazaटोलनाकाcongressकाँग्रेस