शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
4
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
5
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
6
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
7
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
8
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
9
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
10
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
11
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
12
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
13
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
14
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
15
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
16
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
17
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
19
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
20
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता कुटुंबातील पतीचा मृतदेह कास तलावाजवळ

By admin | Updated: May 3, 2015 00:53 IST

तपासाला वेग : दुचाकी सापडली; पत्नी, मुलींचा शोध सुरू

मेढा : जावळी तालुक्यातील रायगाव येथून अचानक बेपत्ता झालेल्या कुटुंबातील पतीचा मृतदेह कास तलावापासून शंभर मीटर अंतरावर आढळून आला असून, पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलींचा शोध अद्याप जारी आहे. तलावापासून जवळच या कुटुंबाची दुचाकी आढळून आल्यावर या तिघांच्या शोधकार्याला वेग आला. रायगाव येथून २० एप्रिलला बेपत्ता झालेल्या या कुटुंबातील प्रवीण धनाजी नावडकर (वय ३५) यांचा मृतदेह कासजवळ आढळून आला आहे. त्यांच्यासोबत पत्नी नूतन प्रवीण नावडकर (वय ३१), मुलगी श्रावणी (वय ४) आणि समृद्धी (वय ५) हे तिघे बेपत्ता झाले होते. या तिघांचा शोध अद्याप लागलेला नसून, कास ग्रामस्थांच्या मदतीने हा परिसर पिंजून काढण्यात येत आहे. घनदाट जंगलाने वेढलेला हा परिसर असल्याने शोधकार्य कठीण झाले आहे. नातेवाइकांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी सोमवार, (दि. २० एप्रिल) सकाळी साडेअकराच्या सुमारास हे चौघेजण दुचाकीवरून (एमएच ११ बीयू ९९२२) कळमवाडी येथे जाण्यास निघाले होते. तेव्हापासून ते परत आलेच नाहीत. प्रवीण नावडकर यांचे वडील धनाजी यांनी २१ एप्रिल रोजी भुर्इंज पोलीस ठाण्यात मुलगा, सून व दोन नाती बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती. दरम्यान, कास-बामणोली रस्त्यावर कास तलावापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर नावडकर यांची दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आली. या दुचाकीपासून जवळच ‘घरगुती कारणातून आम्ही आत्महत्या करीत आहोत,’ असा मजकूर असलेली चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीच्या आधारे परिसरात पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. शनिवारी (दि. २) दुपारच्या सुमारास प्रवीण नावडकर यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी आत्महत्या कशी केली, याबाबत शवविच्छेदनानंतरच माहिती मिळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले. पत्नी नूतन तसेच श्रावणी आणि समृद्धी या दोन्ही मुलींचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. मेढा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील तपास करीत आहेत.