शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पाऊस अन् ढगाळ वातावरणाने बळीराजाची वाढली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST

फलटण : फलटण तालुक्यात यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. मात्र, आठवड्यापासून सततचे ...

फलटण : फलटण तालुक्यात यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. मात्र, आठवड्यापासून सततचे ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि थंडी कमी असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याच्या धास्तीने बळीराजा चिंतेत आहे.

फलटण तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिलासा, तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने पिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटला. यामुळे मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली. यंदा कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळाल्याने बहुतांश शेतकरी कांद्याकडे वळले आहेत. त्याचबरोबर गहू, ज्वारी, हरभरा या पिकांनाही शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. मात्र गेल्या आठवड्याभरात सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. जानेवारी सुरू होऊनही अपेक्षित थंडी वाढलेली नाही. ढगाळ वातावरण आणि थंडीची उणीव असल्याने परिणामी, उत्पन्नात घट होण्याची धास्ती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. सततचे ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि थंडी कमी असल्याने गव्हावर करपा, तांबेरा येऊ लागला आहे. यासोबतच काही भागांमध्ये गव्हाला अळीचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तालुक्यात उसाचे प्रचंड उत्पादन झाले असून, शेतकरी आता ऊसतोडणी झाल्यावर गहू लावण्यात मग्न झालेला आहे. काही ठिकाणी गव्हाच्या पिकांची वाढ चांगले होत असताना, प्रतिकूल वातावरणामुळे त्यांच्या पिकांना फटका बसू शकतो.

थंडी असली की गहू आणि उसाच्या पिकाला चांगला फायदा होतो. सरासरी उत्पन्न वाढते; मात्र अपेक्षित थंडी अजूनही पडलेली नाही. त्यातच सोमवारी झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले आहे, तर ऊसतोडणी कामगारांचे तात्पुरत्या निवाऱ्यामुळे भिजतच रात्र काढावी लागली आहे . या प्रतिकूल हवामानामुळे नवीन लावलेल्या कांद्यालाही करप्याने वेढले आहे. त्यामुळे कांद्याची नवीन लागवड धोक्यात आली आहे.

चौकट

महागड्या औषधांची फवारणी

या खराब हवामानाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध औषधांच्या फवारण्या सुरू केल्या आहेत. शेतकरी महागडी औषधे फवारणी करताना दिसून येत आहेत. परंतु हवामान सुधारले नाही, तर शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पाणी उपलब्ध झाले. परिणामी चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना आशा होती. परंतु ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने यावर्षीच्या उत्पन्नावर देखील पाणी फिरते की काय, या धास्तीने शेतकरीवर्ग संध्या चिंतेत पडला आहे.

कोट

ढगाळ वातावरण आणि अचानक आलेल्या पावसाचा द्राक्षे, गहू या पिकांवर परिणाम होऊ शकतो. गव्हावर तांबेरा, करपा रोग पडू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी लागू शकते. कृषी विभागाने कृषी सहायकांना बांधावर जाऊन पाहणी करायला लावली आहे.

- सुहास रणसिंग,

तालुका कृषी अधिकारी, फलटण

०५फलटण-क्रॉप

फलटण तालुक्यात यंदा गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. मात्र पावसामुळे नुकसान होण्याची भीती सतावत आहे. (छाया : नसीर शिकलगार)