शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

बाबांनी परजली शस्त्रे

By admin | Updated: July 13, 2014 22:53 IST

दक्षिणस्वारीची तयारी : सकाळी शासकीय अन् दिवसभर राजकीय आढावा

प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाडगेले काही महिने मुख्यमंत्र्यांचा होकार ऐकायला आतुर असणाऱ्या समर्थकांना आज दिलासा मिळाला. सकाळी शासकीय आढावा आटोपल्यानंतर त्यांनी दिवसभर राजकीय आढावा घेतला आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कऱ्हाड दक्षिणवर स्वारी करण्यात संकेत देत त्यांनी आपली आगामी राजकीय दिशाही स्पष्ट केली.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड दक्षिणमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. पण येथून काँग्रेसचा उमेदवार कोण, याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता! विद्यमान आमदार विलासराव पाटील-उंडाळकर आठव्यांदा आखाडात उतरण्याची तयारी करताहेत, तर डॉ. अतुल भोसले काँग्रेसकडूनच लढण्यासाठी मोर्चेबांधणी करताहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही दक्षिणेतून लढावे असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. पण स्वत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत मौन बाळगले होते. दिवंगत प्रेमलाताई चव्हाण व आनंदराव चव्हाण यांच्या जयंतीदिनीही ते कऱ्हाड दौऱ्यावर होते. मात्र, त्यावेळीही उमेदवारीबाबत त्यांनी ‘ब्र’ काढला नाही. दरम्यान, त्यांच्या रविवारच्या दौऱ्याची मात्र समर्थकांनी जोरदार तयारी केली होती. जखिणवाडी येथे कऱ्हाड ग्रामीणच्या कार्यकर्त्यांचा जनता दरबार, रात्री एका हॉटेलात व्यापारी असोसिएशनच्या वीसहून अधिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा अन् प्रीतिभोजन. या साऱ्या धावपळीत मक्का मस्जिदमध्ये इफ्तार पार्टीलाही हजेरी! सकाळी विमानतळावरच त्यांच्या स्वागताला आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते जयवंत जगताप, पंचायत समितीतील विरोधी पक्षनेते धोंडीराम जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांची फौज दाखल होती. मुख्यमंत्री शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घ्यायला लागल्यावर ही फौज जखिणवाडीकडे पोहोचली. तेथे कऱ्हाड दक्षिणेतील सुमारे ७५ गावांतील शेकडो कार्यकर्ते हजर होते. या प्रत्येकाशी बाबांनी सुमारे चार तास संवाद साधला. त्यामुळे गावोगावचे कार्यकर्ते सुखावले. संवाद साधताना ‘तुमच्या गावाला माझ्याकडून काही विकासनिधी मिळाला का,’ अशी विचारणा करून आणखी काय मागण्या आहेत, हे त्यांनी जाणून घेतले. प्रत्येकाला नावानिशी हाक मारली आणि नव्या कार्यकर्त्यांची ओळखही करून घेतली. त्यांची देहबोलीच दक्षिणेवरील स्वारीचे संकेत देत होती. आणि शेवटी पत्रकार परिषदेतही त्यांनी मौन सोडले.