शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव बारगळला

By admin | Updated: October 26, 2016 20:28 IST

शेतक-यांच्या उसाच्या ५२ कोटी थकीत बिल वसुलीसाठी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेच्या लिलावासाठी कोणाचीच बोली आली नसल्याने, लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली.

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 26 - शेतक-यांच्या उसाच्या ५२ कोटी थकीत बिल वसुलीसाठी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेच्या लिलावासाठी कोणाचीच बोली आली नसल्याने, लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली. मिरज तहसील कार्यालयात आयोजित लिलावात सहभागी झालेल्या एका खरेदीदाराने माघार घेतली. लिलाव रद्द झाल्याने कारखान्याच्या मालमत्तेच्या मालकी हक्कावर शासनाची नोंद करण्यात येणार आहे.वसंतदादा साखर कारखान्याचे २०१३ व १४ च्या उसाचे बिल ४६ कोटी ३९ लाख रुपये व इतर थकीत देणी शेतकºयांना मिळालेली नसल्याने, साखर आयुक्तांनी कारखान्याची मालमत्ता जप्ती व विक्रीद्वारे रक्कम वसुली करून शेतकºयांची देणी देण्याचे आदेश दिले होते. १२ जुलै २०१४ रोजी महसूल विभागाने महसूल वसुली प्रक्रिया सुरू करून कारखान्याच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याची कारवाई सुरू केली. मालमत्ता जप्तीच्या तीन नोटिसा बजावल्यानंतरही थकबाकीची रक्कम वसूल झाली नाही. त्यामुळे कारखाना मालमत्तेच्या लिलावाची अंतिम नोटीस बजावण्यात आली. ५२ कोटीपैकी केवळ दहा कोटी थकीत देणी असल्याने लिलाव रद्द करण्याची कारखाना व्यवस्थापनाची मागणी तहसीलदारांनी फेटाळली.शेतकºयांच्या थकीत ५२ कोटी रुपये वसुलीसाठी कारखान्याची इमारत वगळता इतर मालमत्ता व जमिनीचा बुधवारी मिरज तहसील कार्यालयात लिलाव आयोजित करण्यात आला होता. लिलावास केवळ एका खरेदीदाराचा प्रतिसाद मिळाला. मात्र कारखाना मालमत्तेवर शेतकºयांच्या थकीत देण्याशिवाय बँका, केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, विक्रीकर विभागाच्या थकबाकीचा बोजा नोंद असल्याने, खरेदीदाराने बोली लावण्यास नकार दिला. लिलावास प्रतिसाद मिळाला नसल्याने, कारखाना मालमत्तेच्या सात-बारा उताºयावर मालक म्हणून शासनाची नोंद करण्यात येणार असल्याचे तहसीलदार शरद पाटील यांनी सांगितले.