शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
3
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
4
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
6
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
7
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
8
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
9
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
10
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
11
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
12
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
13
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
14
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
15
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
16
मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई?
17
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
18
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
19
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
20
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात हवालदारावर कोयत्याने वार! पोलिसांकडून धरपकड, तीनजण ताब्यात

By दत्ता यादव | Updated: July 28, 2024 13:59 IST

ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजता घडली.

दत्ता यादव

सातारा: सातारा बसस्थाकाबाहेर आरडाओरड करत दंगा करणाऱ्या तरूणांना हटकल्याने एका तरूणाने हवालदार दत्ता पवार यांच्या काखेत कोयत्याने वार केले. यामध्ये पवार जखमी झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, नऊ टाके घालण्यात आले आहेत. ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजता घडली.

सातारा शहर पोलिस ठाण्यातील हवालदार दत्ता पवार हे सातारा बसस्थानकातील चाैकीत रात्री ड्यूटीवर होते. त्यावेळी बसस्थानकाबाहेरील रिक्षा थांब्याजवळ काही तरूण दारूच्या नशेत आरडाओरड करत असल्याचे त्यांना प्रवाशांनी सांगितले. त्यानंतर ते बाहेर आले. संबंधित तरूणांना त्यांनी हटकल्यानंतर तेथून दंगा करणारे तरूण निघून गेले. हवालदार दत्ता पवार हे पुन्हा दंगा होऊ नये म्हणून काही वेळ बसस्थानकाबाहेरच उभे होते. सुमारे पंधरा मिनिटानंतर मोपेड दुचाकीवरून चाैघेजण त्या ठिकाणी आले. दत्ता पवार यांना काही कळायच्या आत मोपेडवर अगदी शेवटी बसलेल्या तरूणाने त्यांच्या काखेत कोयत्याने वार केला. यानंतर संबंधित तरूण मोपेडवरून पळून गेले. रक्तबंबाळ अवस्थेतही दत्ता पवार यांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु संबंधित तरूण सापडले नाहीत. 

या प्रकाराची माहिती समजल्यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख, स्थानिक गुन्हे शाखेची टीम तसेच सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे पथक त्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी करून झोपडपट्टीत शोध मोहीम राबविली. त्यावेळी तीन युवक पोलिसांच्या हाती लागले. तिघांनाही ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्यावर नऊ टाके

हवालदार दत्ता पवार यांना साताऱ्यातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, नऊ टाके घालण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसावरच कोयत्याने हल्ला झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली. हल्लेखोरांवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत का, याची पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस