शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 15:51 IST

निवडणूक आयोगाच्या सावळ्या गोंधळाला सरकार जबाबदार 

कराड : एपस्टाईन फाईल्स वरून अमेरिकेत गेल्या ६ महिन्यांपासून मोठा गदारोळ सुरू आहे. ती फाईल उघड झाल्यावर भारताच्या राजकारणावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कदाचित महिनाभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो असे सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.कराड येथे आज, सोमवारी निवासस्थानी पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी अजितराव पाटील - चिखलीकर, कराड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अँड अमित जाधव आदी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, खरे तर हा विषय आंतरराष्ट्रीय आहे. अमेरिकेतील एका उद्योगपतीने अनेक बेकायदेशीर गोष्टी करत अनेक राजकीय लोकांना त्यात गुंतवले आहे. त्यामध्ये अनेक देशातील मोठ्या लोकांची नावे आहेत. त्यामध्ये आपल्या देशातील कोणाची नावे आहेत का हे पहावे लागेल असेही एका प्रश्नावर चव्हाण म्हणाले.सुमारे १० हजार पानांची ती फाईल अमेरिकेच्या संसदेने ताब्यात घेतली आहे. ती फाईल खुली करावी यासाठी ट्रम्प यांच्यावरती दबाव वाढत आहे. ती फाईल प्रकाशित झाली तर बरंच काही समोर येईल.

दरम्यान ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक व्हिडिओ केला आहे. त्या व्हिडिओमध्ये देखील ती कागदपत्रे लवकरच मला मिळतील असे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये उलतापालथी होण्याची शक्यता आहे असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.तयारी नव्हती तर निवडणूक घेण्याची गडबड कशासाठी?निवडणूक आयोगाने सगळा गोंधळ घालून ठेवला आहे. तयारी नव्हती तर त्यांनी निवडणूक घेण्याची गडबड कशासाठी केली? असा सवाल त्यांनी केला. त्याचबरोबर आता ऐनवेळी देखील काही निवडणुका पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत. हा सगळा पोरखेळ करून टाकला आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. या सगळ्या गोंधळाला राज्य सरकार जबाबदार असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.आचार संहिता कोठे आहे?मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पालिका निवडणुक प्रचार सभेत जाहीरपणे प्रलोभन देणारी वक्तव्ये करीत आहेत.हे आचार संहितेत बसते का? याबाबत छेडले असत  आचारसंहिता कोठे आहे? असा प्रश्न करीत निवडणूक आयोग सरकारच्या हातचे बाहुले बनले असल्याची टिका चव्हाण यांनी केली.ते तुम्ही शोधा?तुम्ही मराठी माणूस पंतप्रधान बनू शकतो असे म्हटले आहे. याबाबत ट्विट करताना तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ट‌ॅग केले आहे. नेमका कोण मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो याबाबत छेडले असता ते आता तुम्ही शोधा असे चव्हाण यांनी मिश्कीलपणे सांगितले.