Sangli Crime: भिवर्गी येथे युवकाचा खून, मित्र ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 15:30 IST2026-05-12T15:30:27+5:302026-05-12T15:30:49+5:30

नशेतून घटना घडल्याची चर्चा 

Youth murdered in Bhivargi Sangli friend arrested | Sangli Crime: भिवर्गी येथे युवकाचा खून, मित्र ताब्यात

Sangli Crime: भिवर्गी येथे युवकाचा खून, मित्र ताब्यात

उमदी : भिवर्गी (ता. जत) येथे सोमवारी सायंकाळी २५ वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना घडली. महादेव सिद्धप्पा बिराजदार (वय २५) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी शीलसिद्ध मल्लाप्पा बिराजदार याला उमदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मयत महादेव व शीलसिद्ध हे दोघे मित्र व नातेवाईक होते. दोघे एकत्र असताना काही कारणास्तव दोघांमध्ये वाद निर्माण झाला असावा. यातून झालेल्या मारामारीत महादेव खाली पडल्याने डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नेमक्या कोणत्या कारणावरून वाद झाला आणि खून झाला का, याचा तपास पोलिस करीत आहेत.

घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलिस ठाण्यात अधिकृत नोंद करण्यात आली नव्हती.

सलग खुनांच्या घटनांमुळे जत पूर्व भाग हादरला

उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या दोन दिवसांत खुनाच्या दोन घटना घडल्याने पूर्व भाग हादरला आहे. काल संख येथे युवकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता, तर आज भिवर्गी येथे युवकाचा खून झाल्याची घटना समोर आली. सलग घडणाऱ्या गंभीर घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title : सांगली अपराध: भिवर्गी में युवक की हत्या, दोस्त हिरासत में

Web Summary : जत के भिवर्गी में 25 वर्षीय युवक की हत्या। पुलिस ने एक दोस्त को हिरासत में लिया, संदेह है कि बहस के बाद घातक लड़ाई हुई। क्षेत्र में हाल की हत्याओं से भय और कानून व्यवस्था की चिंता बढ़ गई है।

Web Title : Sangli Crime: Youth Murdered in Bhivargi, Friend Detained

Web Summary : A 25-year-old was murdered in Bhivargi, Jat. Police detained a friend, suspected after an argument led to a fatal fight. Recent murders in the area have sparked fear and raised law and order concerns.