शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

यंदा केवळ तीनच ग्रामपंचायती तंटामुक्त

By admin | Updated: May 26, 2015 00:54 IST

रत्नागिरी जिल्हा : तीनशे ठिकाणचे तंटे कायमच

रत्नागिरी : जिल्ह्यातील ८४४ ग्रामपंचायतींपैकी ५४१ ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्या आहेत. यावर्षी त्यामध्ये आणखी तीन ग्रामपंचायतींची भर पडली आहे. निगडी (मंडणगड), भराडी (मंडणगड), पालशेत (गुहागर) या ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्या आहेत.जिल्ह्यातील ८४४ पैकी ३०३ ग्रामपंचायती तंटामुक्त व्हायच्या शिल्लक आहेत. केवळ तीन ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्याने अद्याप ३०० ग्रामपंचायती तंटामुक्त होणे बाकी आहे. मंडणगड, गुहागर तालुकेवगळता अन्य सात तालुक्यातील ग्रामपंचायती तंटामुक्त झालेल्या नाहीत. जिल्ह्याच्या ९ तालुक्याच्या मूल्यमापन समिती सदस्यांच्या बैठकीत यावर्षी तंटामुक्त होण्याचे प्रमाण नगण्य असल्याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले. इच्छाशक्तीची कमतरता असल्याचे मत बैठकीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील, पोलीस निरीक्षक व तहसीलदार उपस्थित होते. काही ग्रामपंचायती तंटामुक्त होण्याच्या गुणांकनापर्यंत पात्र ठरु शकतात. त्यासाठी ५ जूनपर्यंतच्या उर्वरित कालावधीत पाठपुरावा करण्याची सूचना देण्यात आली आहे.जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मार्गदर्शन करीत असताना गाव तंटामुक्त होण्यासाठी इतर सर्व बाबींची पूर्तता होत असताना केवळ दिवाणी तंट्यांमुळे गाव अपात्र ठरत असेल, तर अशा गावांचा स्वतंत्र तक्ता तयार करावा. या गावांचा स्वतंत्र अहवाल शासनाकडे पाठवून त्याबाबत काही वेगळा विचार करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची सूचना केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी दिवाणी खटले तंटामुक्त होण्यामध्ये अडथळे ठरत असल्याचे मत नोंदवले. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कामे उल्लेखनीय असून, दिवाणी खटले तंटामुक्त समितीच्या गुणांमध्ये गावाचे गुण कमी करत असल्याचे सांगितले.अनेक गावांमध्ये तंटामुक्त योजनांचा अहवाल तयार करण्यात ग्रामसेवक, पोलीसपाटील, तलाठी अनिच्छा दर्शवतात. त्यामुळे गावे तंटामुक्त होण्यास विलंब होतो. याबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारीवर्गाकडून काम करुन घेण्याची सूचना बैठकीत दिली. (प्रतिनिधी)