शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘माणगंगा’च्या रिंगणात चुरशीचे ‘पाणी’

By admin | Updated: May 27, 2015 00:58 IST

देशमुखांना आव्हान : गोपीचंद पडळकरांच्या परिवर्तन पॅनेलमुळे तुल्यबळ लढत

अविनाश बाड -आटपाडी -एरवी वर्षानुवर्षे कोरड्या असणाऱ्या इथल्या माणगंगा नदीला जणू पूर यावा, अगदी तशी माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची अवस्था झाली आहे. कारखान्याची स्थापना झाल्यापासून यंदा प्रथमच माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकारी पॅनेल आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील माणगंगा परिवर्तन पॅनेलच्या प्रचाराच्या वर्षावात ऐन उन्हाळ्यात कारखाना आणि सभासद चिंब भिजून गेले आहेत.बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दि. २५ नोव्हेंबर १९८१ रोजी कारखान्याची नोंदणी झाली. कारखान्याची स्थापना १९८५ मध्ये झाली, तर १९८७ मध्ये पहिले गाळप झाले आणि तालुक्यात एका नवीन पर्वाची सुरूवात झाली. सदैव दुष्काळी असलेल्या या भागात कारखान्याच्या निर्मितीपासूनच उलटसुलट चर्चांना उधाण आले. जिथे प्यायला पाणी नाही, तिथे कारखान्यात उसाऐवजी काय माळावरची कुसळे घालून साखर तयार करणार काय? अशा प्रश्नांनी हेटाळणीही झाली. पण अपवाद वगळता भीषण दुष्काळी परिस्थितीतही अगदी टॅँकरने पाणी आणून कारखाना सुरू ठेवण्यात आला. कारखान्याला कायमस्वरूपी पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पिलीव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथून जलवाहिनीने पाणी आणण्यात आले.माणगंगा साखर कारखाना म्हणजे देशमुख गटाची मोठी राजकीय ताकद आहे. सध्या राजेंद्रअण्णा देशमुख, सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख, आ. दीपक साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सहकारी पॅनेलने सभासदांची थेट भेट घेण्याचा आणि सभांचा धडाका लावला आहे.कारखान्याच्या स्थापनेपासून गेल्या २० वर्षांत निवडणुकीची एवढी चुरस निर्माण होण्याचे एकमेव कारण म्हणजे, भाजपचे नेते गोपीचंद पडळकर. त्यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सभासदांसमोर प्रस्थापित देशमुख गटाच्या कारभारावर आरोपांच्या फैरी झाडल्याने प्रचारात आतापासूनच रंगत आली आहे. वाहनांवर ध्वनिक्षेपक लावून प्रचार सुरू आहे. कारखान्याच्या इतिसाहात प्रथमच सभासदांना या निवडणुकीत मते देण्याचे आवाहन केले जात आहे. गुरुवार, दि. २८ मे रोजी मतदान होणार आहे. सत्ताधारी देशमुख गटाला आव्हान देणाऱ्या पडळकर गटाचे भवितव्य या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. माणगंगा-कृष्णा मीलनाने संघर्षात वाढटेंभूचे पाणी विधानसभा निवडणुकीपूर्वी आटपाडी तालुक्यात दाखल झाले. नुकतेच निंबवडे तलावातून विठलापूरच्या ओढ्यातून माणगंगा नदीला मिळाले. त्यामुळे भविष्यात सामूहिक ठिबक सिंचन अथवा पाणी उपलब्ध झाल्यामुळे परिसरात उसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कारखान्याचा उसाचा दुष्काळ संपण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी-भाजपबरोबर शिवसेनेनेही उडी घेतली होती. पण त्यांनी माघार घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा प्रस्थापित नेते विरुद्ध पडळकर, असा सामना रंगला आहे.