शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे वाड्यांत ‘पाणी’बाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2015 00:54 IST

रत्नागिरी जिल्हा : विहिरी आटल्या अन् घसे सुकले

रत्नागिरी : गतवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यात पाणीटंचाई कमी असून, ७४ गावांतील १५९ वाड्यांमधील जनतेची पाण्यासाठी तडफड सुरु आहे. शासनाकडून करण्यात येणारा पाणी पुरवठा अपुरा पडत आहे.जिल्ह्यात पडणारा अवेळी पाऊस, गारा यांमुळे गतवर्षीपेक्षा यंदा पाणीटंचाईचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने लोक हैराण झाले आहेत. त्यातच नाले, ओढे, विहिरी, विंधण विहिरी आटल्याने टंचाईग्रस्त गावांतील जनावरेही पाण्यासाठी तडफडत आहेत. अवकाळी पावसामुळे पाण्याचे संकट कमी झाले असले तरीही ज्या ज्या ठिकाणी टंचाई जाणवत आहे, त्याठिकाणी ती खूपच भीषण स्वरुपात जाणवत आहे. मैलोन्मैल पायपीट करूनही पाणी मिळत नसल्याने ग्रामीण भागातील महिलावर्ग वैतागला आहे. विहीरीचे तळही आटले असून पाण्याचा कोणताही स्त्रोत गावात शिल्लक नसल्याने महिलांची कुचंबणा झाली आहे.आज जिल्ह्यातील टंचाईग्रस्तांचा आढावा घेतला असता जिल्ह्यात ७४ गावातील १५९ वाड्यांमध्ये पाणीटंचाईचा उद्रेक झाला आहे. या टंचाईग्रस्तांना एक ते दोन दिवसआड टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षीच्या उन्हाळ्यामध्ये आजच्या दिवशी ९४ गावांतील २०४ वाड्यांना २४ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता.डोंगरदऱ्यात वसलेल्या धनगरवाड्यांतील लोकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. कारण ह्या वाड्या डोंगरदऱ्यामध्ये वसल्या असल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे येथील विहिरी, विंधन विहिरी, ओढे, झरे आदी आटल्याने रहिवाशांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. टंचाईग्रस्तांमधील अनेक वाड्यांमध्ये पाण्याचा टँकर नेताना चालकाला मोठी कसरतही करावी लागते.या टंचाईग्रस्तांना ११ शासकीय आणि ११ खासगी अशा एकूण २२ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टंचाईग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी अवेळी पडणाऱ्या पावसाचा परिणाम म्हणून गतवर्षीपेक्षा ती कमीच आहे. कारण पावसाचे पाणी जमिनीत झिरपल्याने पाण्याची पातळी खालावत नाही. मात्र, ज्या गावातील वाड्यांमध्ये सध्या पाणीटंचाई सुरु आहे. त्या गावातील ग्रामस्थांची पाण्यासाठी तडफड सुरु आहे.त्यांना फक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र, इतर वापरासाठी लागणारे पाणी कुठून आणणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी टंचाईग्रस्त भागातील लोकांचे हाल होत आहेत. पाण्याचे टँकर पुरवण्यास जिल्हा प्रशासनही कमी पडले असल्याचे यावरून दिसून येते. (शहर वार्ताहर)केवळ २२ टँकर्स