शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवी मार्केटिंगचा चार हजारांवर ग्राहकांना गंडा

By admin | Updated: June 14, 2015 00:06 IST

कार्यालय बंद : ठकसेन प्रमोद साळुंखे बेपत्ता

भिलवडी : ‘साडेपाचशे रुपयांत मारुती मोटारीचे धनी व्हा’, ‘खुशियोंके रंग वैष्णवी मार्केटिंगके संग’, ‘इनाम का हकदार हर खरीददार’ अशा फसव्या जाहिरातबाजीने सामान्यांना भुरळ घालणाऱ्या रेठरधरण (ता. कऱ्हाड) येथील प्रमोद साळुंखे याच्या मालकीच्या वैष्णवी मार्केटिंग या कंपनीने पलूस तालुक्यातील चार हजारांवर ग्राहकांना गंडा घातल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. पलूस येथील जिल्हा परिषद शाळेजवळच्या कार्यालयाचा गाशा चार दिवसांपासून कंपनीने गुंडाळला. आमणापूर (ता. पलूस) येथील समीर आदम सुतार मारुती अल्टो मोटारीचे विजेते ठरूनही त्यांना बक्षीस न मिळाल्याने हा प्रकार उघडकीस आला असून, कंपनीने ग्राहकांना सव्वाकोटीवर रकमेचा गंडा घातल्याची चर्चा तालुक्यात आहे. पलूससह आमणापूर, धनगाव, माळवाडी, भिलवडी, अंकलखोप, नागठाणे, बांबवडे, कुंडल, बुरूंगवाडी, भिलवडी स्टेशन, वसगडे, आदी गावांतील ग्राहकांना ३३०० रुपये भरून कोणतीही भेटवस्तू मिळाली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वैष्णवी मार्केटिंग या कंपनीने सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांतील विविध तालुक्यांची ठिकाणे आणि मोठी बाजारपेठ असणाऱ्या गावांमध्ये स्थानिक एजंटांना हाताशी धरले. आलिशान कार्यालये थाटून हप्त्याने घरगुती वस्तू विक्रीच्या नावाखाली लकी ड्रॉ सुरू केला. बारा आठवड्यांची मुदत असणाऱ्या या योजनेमध्ये आठवड्याला ५५० रुपये असे एकआड एक आठवड्यास सहा हप्ते भरावयाचे होते. पहिले चार आठवडे टीव्ही, फ्रीज, मोटारसायकल, स्कूटी, लॅपटॉप, शिलाई मशीन अशा १६ बक्षिसांचे विजेत्यांना वाटप केले गेले. २१ मे अखेर कंपनीने पलूस येथे सर्व ड्रॉ काढले; पण पाचव्या ड्रॉपासून बाराव्या ड्रॉअखेर कोणालाच बक्षिसे दिली गेली नाहीत. आमणापूर येथील समीर सुतार यांना मारुती अल्टो मोटार लागल्याचे दूरध्वनीवरून सांगण्यात आले. साध्या कागदावर संगणकावर टाईप केलेले जा. क्र. २/१४४८ या क्रमांकाचे २६ मे २०१५ रोजीचे पत्र देण्यात आले. यामध्ये ‘समीर ए. सुतार यांना मारुती अल्टो देण्यात यावी’, असा मजकूर आहे. सुतार रेठरे बुद्रुक येथील संस्थेच्या गोदामामध्ये गेले असता, गाडी कंपनीकडून येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी बरेच हेलपाटे मारले, पण केवळ आश्वासनेच मिळाली. चार दिवसांपूर्वी ते पुन्हा गोदामाला भेट देण्यासाठी गेले, त्यावेळी वस्तूंनी भरलेले गोदाम पूर्णपणे रिकामे असल्याचे दिसले. प्रमोद साळुंखेची घरी जाऊन चौकशी केली असता, तो गावामधून बेपत्ता झाला असून, त्याच्या भावाने रेठरे बु्रद्रुकच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी पलूसमधील गोरंबेकर व मुल्ला या दोन शाखाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, दोघांचेही मोबाईल बंद होते. पलूसमधील जिल्हा परिषद शाळेसमोरील प्रशांत बिल्डिंगमधील कार्यालयाला टाळे ठोकलेले दिसले. कंपनीने नावाचे फलक काढून सर्व साहित्यासह गाशा गुंडाळला आहे. याबाबत सुतार यांच्यासह फसवणूक झालेले चार हजारांवर ग्राहक पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. महसूल व पोलीस खात्याने असे बेकायदेशीर लकी ड्रॉ चालविणाऱ्या बोगस कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)