शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘अंगणवाडी’तील मानधनासाठी आग्रह

By admin | Updated: December 23, 2015 01:17 IST

जिल्हा बँक : राज्य शासनाशी पत्रव्यवहार करण्याची तयारी

सांगली : जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे मानधन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतून होणे आवश्यक आहे. गावा-गावात बँक पोहोचली असल्यामुळे अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीयीकृत बँकेपेक्षा जिल्हा बँकच अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे या गोष्टीसाठी आम्ही शासनस्तरावर आग्रही मागणी करणार असल्याची माहिती मंगळवारी बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. राज्यातील अशा ज्या जिल्हा बँका सक्षम आहेत, त्याठिकाणी अंगणवाडी सेविकांचे मानधन जिल्हा बँकांमार्फत केल्यास त्याचा लाभ बँकेपेक्षा अंगणवाडी सेविकांना अधिक होऊ शकतो. छोट्या गावांमध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा अस्तित्वात नाहीत. त्यामुळे सेविका किंवा मदतनीसांना मानधन काढण्यासाठी पैसे खर्च करून तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. मिळणाऱ्या मानधनाचा विचार केला, तर हा प्रवासाचा खर्च न परवडणारा आहे. जिल्हा बँकेत खाती काढून बँकेमार्फत ही सेवा पुरविली गेल्यास हा संपूर्ण खर्च वाचणार आहे. बँकेची मोबाईल व्हॅनही अस्तित्वात असल्याने मानधन मिळविण्यासाठी कोणताही खर्च सेविकांना करावा लागणार नाही. त्यामुळे याबाबत शासनाला लवकरच आम्ही पत्र पाठविणार आहोत. प्रशासनाला यासंदर्भात मंगळवारी आदेश देण्यात आले आहेत. शासनाकडे आग्रही मागणी आम्ही करू. असा निर्णय अंगणवाडी सेविकांच्या सोयीचा निर्णय होईल. मध्यवर्ती बँकेचा विस्तार हा अन्य बँकांपेक्षा अधिक मोठा आहे. छोट्या-छोट्या गावांमधील लोकांनाही बँकिंगसाठी जिल्हा बँकच अधिक सोयीची ठरत आहे. वर्षानुवर्षाचा हा अनुभव पाहता, अंगणवाडी सेविकांच्या मानधनाच्या बाबतीतही जिल्हा बँकच अधिक सोयीची ठरेल, असे पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)संख्या ५ हजाराच्या घरातजिल्ह्यातील अंगणवाड्यांची संख्या २४00 च्या घरात आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची जिल्ह्यातील संख्या पाच हजाराच्या घरात जाते. त्यामुळे इतक्या खातेदारांना सेवा देणे जिल्हा बँकेला सहजशक्य आहे. त्यामुळे बँकस्तरावर आता यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.